बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

दिलासादायक! पुण्यात नव्याने कोरोनाबाधित रुग्णसंख्येपेक्षा 4000 हून अधिक डिस्चार्ज, वाचा आजची आकडेवारी

पुणे | गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यात कोरोना संसर्गाचा प्रसार मोठ्या झपाट्याने होत आहे. कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र पुण्यात आज नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक आहे.

पुण्यामध्ये आज दिवसभरात 2837 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 4673 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 82 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. तर 23 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत.

पुण्यात सध्या 1403 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,44,539 इतकी आहे. तर पुण्यात 35,586 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 7,304 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,00,649 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 17118 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-  

“भाजपने पोटदुखीचा इलाज करावा आणि भाजपशासित राज्यांच्या खोट्या आकडेवारीकडं लक्ष द्यावं”

क्रीडा विश्वावर शोककळा! भारताच्या दोन सुवर्णपदक विजेत्या ऑलिम्पिकवीरांचं कोरोनामुळे निधन

अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकलीने देश कोरोनामुक्त होण्यासाठी ठेवले पूर्ण रोजे

‘जिद्द म्हणजेच शरद पवार, दुसरं काही नाही’; राऊतांनी घेतली पवारांची भेट

कोरोना आकड्यांची बनवाबनवी तत्काळ थांबवा- देवेंद्र फडणवीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More