बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आनंदाची बातमी! पुण्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, पाहा आजची दिलासादायक आकडेवारी

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. आनंदाची बाब म्हणजे आज पुण्यात नव्या रूग्णांची नोंद कमी अन् डिस्चार्ज दिलेल्या रूग्णांची संख्या जास्त आहे. राज्य सरकारने केलेल्या लॉकडाऊनचा फायदा होत असल्याचं या कमी झालेल्या संख्येवरून दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 331 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 451 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 20 जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलं आहे. यामध्ये 10 जण पुण्याबाहेरील होते.

पुण्यात सध्या 517 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,73,870 इतकी आहे. तर पुण्यात 3182 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 8466 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,62,222 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 6073 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. त्यामुळे ही कमी झालेली आकडेवारी अशाच प्रकारे आणखी कमी व्हायला हवी.

थोडक्यात बातम्या- 

‘अजित पवारच एक दिवस आघाडीचं सरकार पाडतील’; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य

आता लस घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर जाण्याची गरज नाही; राजेश टोपेंची मोठी घोषणा

‘…तर ते पाठीत खंजीर खुपसल्यासारखं होईल’; पवारांच्या निवडणूक एकत्र लढण्याच्या वक्तव्यावर पटोलेंचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात 24 तासात फक्त 2 जणांचा मृत्यू, तर नव्या 15 बाधितांची नोंद

ब्लॅक फंगसच्या औषधावर आणि कोरोना लसीवर GST लागणार का? अर्थमंत्र्यांची महत्त्वाची घोषणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More