बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुणेकरांनो चिंता वाढली! कोरोना रूग्णांच्या आजच्या आकडेवारीत वाढ, वाचा आकडेवारी

पुणे | पुण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होत असली तरी डिस्चार्ज देण्यात येणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. कोरोना रूग्णसंख्या  कमी जास्त होताना दिसत आहे.

पुण्यात आज दिवसभरात 243 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 208 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज कोरोनामुळे 4 जण हे पुण्याबाहेरील आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,95,586 इतकी आहे. तर पुण्यात 2265 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

आत्तापर्यंत एकूण 8926 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 4,84,395 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 7840 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे दररोज नव्याने नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. त्यादृष्टीने पुणे महानगरपालिका प्रशासनाने कडक पावलं उचललीत. मात्र वाढती आकडेवारी पुणेकरांचं टेन्शन वाढवणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“सत्तेचा गैरवापर याआधी झाला नसेल तर सुप्रिया सुळेंनी वडिलांना विचारायला हवं”

“आधी पाया पक्का करावा लागतो”; व्यासपीठावर येताच धनंजय मुंडे आणि प्रीतम मुंडेंमध्ये जोरदार टोलेबाजी

‘स्टेनगन’ थंडावली! चांगल्या-चांगल्या फलंदाजांच्या तोंडचं पाणी पळवणारा डेल स्टेन निवृत्त

“घंटानाद करा, नाही तर आणखी कसला नाद करा, पण आमचा नाद करू नका”

ख्रिस्तियानो रोनाल्डोची घरवापसी, दोन वर्षाच्या कराराची किंमत ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More