देश

पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तुफान राडा; मतदान केंद्राबाहेरच मारामारी!

कोलकाता |  पश्चिम बंगालच्या बैरकपूरच्या मतदान केंद्राबाहेर गदारोळ झाल्याची माहिती मिळत आहे. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली, असा आरोप भाजपचे उमेदवार अर्जुन सिंग यांनी केला आहे.

एक महिलेला मतदान करु देत नव्हते आणि तिच्या मुलाला मारण्याची धमकीही देण्यात आली, असं ती महिला अर्जुन सिंग सांगत असतानाच तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी मला मारण्यास सुरवात केली. हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडलं, असा आरोप अर्जुन सिंग केला आहे.

तृणमूल काँग्रेसचे उमेदवार दिनेश त्रिवेदी हे बैरकपूर मतदारसंघातून उमेदवार आहेत तर त्यांच्याविरोधात भाजपचे उमेदवार अर्जुन सिंग हे लोकसभेच्या रिंगणात आहेत.

पश्चिम बंगालमध्ये बैरकपूर मतदान केंद्रावर मतदानादरम्यान भाजप आणि तृणमूल काँग्रेस पक्षात तणावाचं वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.

महत्वाच्या बातम्या

-पाचव्या टप्प्याच्या मतदानाला सुरवात; ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

-“मनमोहन सिंहांचा रिमोट कंट्रोल गांधी घराण्याजवळ; त्यांना देशाची नाही तर खुर्चीची चिंता होती”

-राज्य सरकार दुष्काळाच्या मुद्द्यावर अतिशय गंभीर- चंद्रकांत पाटील

-कालच्या ‘थप्पड’ प्रकारानंतर केजरीवालांच्या दिल्लीतल्या ‘रोड-शो’ ला पोलिसांचा वेढा!

-देशाला नव्या दमाच्या नेत्याची जास्त गरज- मनमोहन सिंह

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या