केरळमधील काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा भाजप मध्ये प्रवेश; काँग्रेसला मोठा धक्का

नवी दिल्ली | केरळमधीप काँग्रेसचे वरिष्ठ नेते टॉम वडक्कन यांनी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. टॉम वडक्कन काँग्रेसचे प्रवक्ते राहिले आहेत.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसनं घेतलेली भूमिका योग्य नव्हती, असं टॉम वडक्कन यांनी म्हटलं आहे.

देशप्रेमाबद्दल कोणताही समजोता केला जाणार नाही, असं टॉम वडक्कम म्हणाले आहेत.

दरम्यान, काँग्रेसमध्ये घराणेशाही असून त्याला कंटाळून भाजपमध्ये प्रवेश करत आहे. नरेंद्र मोदी यांचं टॉम वडक्कन यांनी कौतुक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

मुलाच्या विरोधात प्रचार करणार नाही- राधाकृष्ण विखे पाटील

-नेत्यांची मुलं म्हणून पक्षात घेणार का?- विजय शिवतारे

-वडिलांच्या जिवावर जास्त दिवस राजकारण करता येत नाही- विजय शिवतारे

धनगर समाजाचे नेते हेमंत पाटील काँग्रेसच्या वाटेवर

-नाना पटोलेंनी पक्ष सोडला म्हणून माझा आशीर्वाद संपला नाही- नितीन गडकरी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या