महाराष्ट्र मुंबई

आता युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर!

Loading...

मुंबई |  शिवसेनेच्या महत्वाच्या कार्यक्रमांना कोल्हापूरमधून सुरूवात होती हा इतिहात आहे. मात्र त्याच कोल्हापूर सांगलीला महापुराने वेढा दिल्यावर शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी सांगली कोल्हापुरला जाण्याचं टाळलं. यावरून त्यांच्यावर प्रचंड टीका झाली. मात्र उशिरा का होईना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे उद्यापासून सांगली कोल्हापुरच्या पूरग्रस्त भागाला भेटी देतील.

उद्या रविवारी आदित्य ठाकरे सांगली आणि कोल्हापुरातील पूरग्रस्तांच्या अडचणी जाणून घेतील. त्यांचे प्रश्न समजावून घेतील.

Loading...

ठाकरे परिवारातील कोणीही सांगली कोल्हापूरला भेट दिली नसली तरी (राज ठाकरे अपवाद) शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक पूरग्रस्त भागात मदतीसाठी कायम सक्रिय राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं. मंत्री एकनाथ शिंदे तर सांगली कोल्हापुरात तळ ठोकून होते.

दरम्यान, सांगली- कोल्हापूरमधल्या पूरग्रस्त भागात जाऊन मला जनतेला कोरडी सहानुभूती दाखवायची नव्हती. म्हणून मी गेलो नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-गोपीचंद पडळकर ‘या’ मतदारसंघातून विधानसभा लढणार???

-समाजसुधारक म्हणून पंतप्रधान मोदी ओळखले जातील- अमित शहा

-पंडित नेहरूंमुळेच गोवा मुक्तीस उशीर झाला; भाजपच्या शिवराज सिंह चौहान यांची टीका

Loading...

-….तर एक दिवस भाजपचं काँग्रेस होईल- महादेव जानकर

-काँग्रेस रस्ता भरकटलेला पक्ष; या माजी मुख्यमंत्र्यांचा पक्षाला घरचा आहेर!

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या