सर्वसामान्यांना दिलासा! टोमॅटोचे दर अर्ध्यावर, पण इतर भाज्या कडाडल्या

Tomato Price | सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  तब्बल दोन महिन्यांनी टोमॅटोचे दर खाली आले आहेत. दोन महिन्यापासून टोमॅटोचे दर हे शंभर रुपयांवर होते. उत्तर भारतात टोमॅटोचा आलेख गेल्यावर्षीप्रमाणे वाढत होता. यामुळे सामान्य नागरिकांच्या जेवणातून टोमॅटो जणू गायबच झाले होते. हे दर अजून (Tomato Price ) वाढण्याची शक्यता होती.

पण केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप केला. तर राज्यात टोमॅटोचे उत्पादन वाढले. त्यांची आवक वाढली. मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारात आल्याने तब्बल दोन महिन्यांनी दर हे अर्ध्यावर आले आहेत. मात्र, इतर काही भाज्या महाग झाल्या आहेत.

टोमॅटोचे दर आले अर्ध्यावर

येत्या 5 ऑगस्ट पासून श्रावण महिना सुरू होत आहे. 5 तारखेला पहिला श्रावण सोमवार असणार आहे. त्यामुळे या काळात नागरिक शाकाहार जेवण घेतात. अशात टोमॅटो आणि इतर काही भाज्यांचे दर घसरल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

गेल्या दोन महिन्यामध्ये मुंबई, दिल्ली तसेच कोलकाता यांसारख्या शहरात टोमॅटो 100 रुपये किलोच्या भावाने विकले गेले. राज्यातही बऱ्याच भागात टोमॅटोचे दर कडाडले होते. आता या किंमती (Tomato Price )40 ते 48 रुपये प्रति किलोवर आल्या आहेत.पण, भाजीपालाचे दर वाढले आहेत.

इतर भाज्यांचे दर वाढले

मुंबईसह आसपासच्या बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. जून महिन्यात शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. त्यामुळे बाजारात आता आवक वाढली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्याच्या दोनच दिवसांत आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. चांगल्या प्रतिच्या टोमॅटोला किलोमागे 20 रुपये तर सर्वात लहान टोमॅटोला किलोमागे 8 रुपयांचा भाव देण्यात आला आहे.

APMC बाजारात मागील दोन महिन्यात टोमॅटोचा (Tomato Price )किरकोळ भाव हा 80 रुपये प्रति किलो होता. तर चांगल्या दर्जाचा टोमॅटो हा 100 रुपये प्रति किलो मिळत होता. आता हा भाव 40-45 रुपये प्रति किलोवर आला आहे. पण, वाटाणे प्रति 100 किलो तर भेंडी, गवार, पापडी आदी भाज्यांचे दर 60 ते 70 किलो झाले आहेत.

News Title – Tomato Price drop 

महत्त्वाच्या बातम्या-

लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर करण्यात अदिती तटकरेंचं रायगड आघाडीवर!

अखेर ऐश्वर्या रायने दिली कबूली म्हणाली, “सर्व काही….”

OTT वरील ‘हे’ 3 चित्रपट एकटे पाहण्याचं धाडस करू नका; खूप जास्त..

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी, ‘या’ तारखेला सर्व्हिस राहणार बंद

पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!