सर्वसामान्यांना दणका! टोमॅटोचे दर गगनाला भिडले, एक किलोचा भाव तब्बल ‘इतके’ रुपये

Tomato Price Hike | सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठी झळ बसली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजी पाल्यांचे दर वाढताना दिसले. टोमॅटो, हिरवी मिरची आणि पालेभाज्या यांसारख्या भाज्याचे दर गगनाला भिडल्याचं दिसून आलं. बदलत्या हवामानाचा पीकांवर गंभीर परिणाम (Tomato Price Hike) झालाय.

सध्या पाले भाज्यांचे दर काही प्रमाणात उतरले आहेत. मात्र, कांदा-टोमॅटोचे दर अजूनही वरचढच आहेत. मुंबई, दिल्ली तसेच कोलकाता यांसारख्या शहरात टोमॅटो 100 रुपये किलोच्या भावाने विकले जात आहेत. राज्यातही बऱ्याच भागात टोमॅटोचे दर कडाडले आहेत.

टोमॅटोचे भाव गगनाला भिडले

त्यामुळे सामान्य नागरिकांच्या जेवणातून कांदा आणि टोमॅटो जणू गायबच झाला आहे. एप्रिल-जून मधील तापमानाचा फटका टोमॅटोच्या उत्पादनाला बसला असून, गेल्या वर्षीच्या मान्सूनमुळे टोमॅटोचा (Tomato Price Hike) तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या टोमॅटोचा सरासरी भाव 33 टक्क्यांनी वाढून 80 रुपये प्रतिकिलो झाला आहे.

गेल्या आठवडाभरात चांगल्या प्रतीच्या टोमॅटोचे दर किमान 20 रुपयांनी वाढले आहेत. लहान आकाराचे वाण आणि रंग नसलेले टोमॅटो थोडे स्वस्त आहेत. मात्र, जरा मोठे आणि लाल रंगाचे टोमॅटोचे दर प्रचंड वाढले आहेत.

सर्वसामान्यांच्या जेवणातून टोमॅटो गायब

मुसळधार पावसामुळे (Tomato Price Hike) काढणी आणि पुरवठा मंदावला आहे. जुलै ते ऑगस्ट या कालावधीत कोलार हा बहुतांश राज्यांचा एकमेव मोठा पुरवठादार आहे. ईशान्य भारतात देखील भाजी पाल्यांचे दर वाढल्याचं चित्र आहे.

हिरव्या पालेभाज्यांचे उत्पादन घटल्याने टोमॅटो, बटाटा आणि कांद्याकडे मागणी वाढली आहे. नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टमध्ये म्हटलंय की, जूनमध्ये अन्नधान्यमहागाई वाढून 9.36 टक्क्यांवर पोहोचली. यामध्ये भाजीपाला 29.32 टक्के, कडधान्ये 16.07 टक्के आणि तृणधान्याच्या किंमतीत 8.75 टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

News Title –  Tomato Price Hike 

महत्त्वाच्या बातम्या-

सावधान! हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

निवडणूक आयोगाचा उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा!

विठ्ठलाचं दर्शन घेऊन परतणारी वारकऱ्यांची जीप थेट विहिरीत कोसळली; 7 जणांचा दुर्दैवी मृत्यू

चार वर्षांच्या संसारानंतर हार्दिक-नताशा विभक्त; घटस्फोटानंतर नताशाला किती रक्कम मिळणार?

घराबाहेर पडण्यापुर्वी ही बातमी नक्की वाचा!