बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘टोमॅटो पेट्रोलपेक्षाही महागलं’; वाढत्या महागाईवरुन शिवसेनेचे मोदी सरकारवर ताशेरे

मुंबई | कोरोनाचं सावट अद्यापही कमी झालेलं नाही. त्यामुळे कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी सरकार कार्यरत आहे. या कोरोना काळात नागरिकांना अनेक वाईट गोष्टींना तोंड द्यावं लागलं. यामध्ये महागाईनं तर लोकांना हैराणंच करुन सोडलं आहे.

कोरोना काळात सोनं-चांदी महागली. पेट्रोल-डिझेलचे दरही गगनाला भिडले. या महागाईमध्ये गृहीणींचं बजेटही कोलमडून गेलं. त्यामुळे भाजीपाल्यासारख्या जीवनावश्यक वस्तूंसाठीही महागाईला तोंड द्याव लागत आहे. अशातच आता या महागाईवरुन शिवसेनेनं म्हटलं आहे.

वाढत्या महागाईवरुनच शिवसेनेनं केंद्रातील मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. तसेच, हिवाळ्यात स्वस्त असणारा टोमॅटो पेट्रोलपेक्षाही अधिक महाग झालाय, तर वाटाण्यानही 150 रुपयांचा आकडा पार केला असल्याचं म्हणत मोदी सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

दरम्यान, महागाईने रौद्ररूप धारण केलं आहे. राष्ट्रीय पातळीवर चुकीचे निर्णय घेतल्याने त्याची झळ सर्वसामान्यांना बसत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहे.

थोडक्यात बातम्या – 

दिल्लीत नेमकं शिजतंय काय?, चंद्रकांत पाटलांच्या पाठोपाठ फडणवीसही दिल्लीत

सलाम त्यांच्या कार्याला! जीव धोक्यात घालत केलं लसीकरण पूर्ण

“बहोत हो गई महंगाई की मार, अब की बार…”, भाजपला खडे बोल

आधी धक्का, मग खळबळ अन् एकनाथ शिंदेंना हसू आवरेना – पाहा व्हिडीओ

“मी आता आई होण्यासाठी जास्त वाट पाहू शकत नाही”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More