रोहित पवारांचा रथ अडवण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात!

कर्जत- जामखेड | राज्याचं लक्ष वेधून घेतलेल्या कर्जत -जामखेड मतदारसंघात मंत्री राम शिंदे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या येणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत राम शिंदे आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत.

राम शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या मतदारसंघात लक्ष घातल्याचं दिसत आहे.

युतीचे उमेदवार आणि भाजपचे नेते राम शिंदे यांच्या प्रचारासाठी सिद्धटेक इथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 11 ऑक्टोबर ला सकाळी 11 वाजता सभा होणार आहे, अशी माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्याच्या सभेमुळे रोहित पवारांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-