बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्तेची भांग प्यायलेले उद्या मातोश्री आणि सेना भवनावर सुद्धा कब्जा करतील”

मुंबई | शिवसेनेचे (Shivsena) अतंर्गत बंड संपूर्ण महाराष्ट्र आणि देश गेला महिनाभर पहातो आहे. शिवसेनेचे निष्ठावंत म्हणता येण्यासारखे आमदार, नगरसेवक, जिल्हाप्रमुख माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि आता लोकसभेचे विद्यमान खासदारसुद्धा बंडाच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) बंड करुन सत्तापालट केला आणि शिवसेनेला मोठा धक्का दिला. त्यानंतर त्यांनी आपला गट हीच खरी शिवसेना असे म्हणत मूळ पक्षावरच दावा केला.

आता यावर शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सत्तेची आणि आमदारकीची भांग प्यायलेले शिवसेना भवनच काय तर उद्या मातोश्रीवरच कब्जा करतील. पण शिवसेना शरण जाणार नाही, असं राऊत म्हणाले. शिंदे गट आता शिवसेना भवनावर सुद्धा दावा ठोकणार असल्याचं सांगितलं जात आहे.

महाराष्ट्राचं विभाजन हा भाजपचा (BJP) मूळ उद्देश असून त्यासाठी अखंड शिवसेनेचे तुकडे करण्याचे त्यांचे ईरादे आहेत, असा आरोप राऊतांनी केला. नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेण्याकरीता गेले आहेत. यापूर्वी शिंदे गटाने शिवसेनेेचे अधिकृत निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर दावा केला होता. तो खटला न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे आता ते सेना भवनावर (Sena Bhawan, Dadar) सुद्धा दावा करणार की काय, असा प्रश्न जनतेला पडला आहे.

शिवसेना भवन ही शिवाई ट्रस्टची मिळकत आहे. सामना (Samna) ही प्रबोधन ट्रस्टची मिळकत आहे. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या व्यवस्था करुन ठेवल्या आहेत, त्या व्यवस्थेनुसार सर्व सुरु आहे. त्यांना महाराष्ट्र तोडायचा आहे म्हणून अगोदर शिवसेना तोडायची आहे. उद्या म्हणतील मातोश्रीतही जातो. त्यांचा काही भरवसा नाही. सत्तेची भांग प्यायलेले काहीही करु शकतात, असं यावेळी संजय राऊत म्हणालेत.

थोडक्यात बातम्या – 

कोरोनानंतर आता डेंग्यूचा शिरकाव; ‘ही’ लक्षणे आढळल्यास ताबडतोब हॉस्पिटल गाठा

राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट जारी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा; महाराष्ट्रातील ‘हा’ रस्ता होणार राष्ट्रीय महामार्ग

अमित शहांचे सहकारी सल्ला घेण्यासाठी शरद पवारांच्या भेटीला; खुद्द पवारांनी दिली माहिती

उद्धव ठाकरेंना एकाच दिवशी सलग पाच धक्के!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More