बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

धक्कादायक! हळदीच्या आदल्या दिवशीच धारदार हत्याराने युवकाचा खून

नाशिक | नाशिक येथील घोटी तालुक्यात अत्यंंत धक्कादायक घटना घडली आहे. हळदीच्या अदल्या दिवशीच तरूणाची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत. संबंधित मृत तरूणाचं नाव हरिचंद्र चव्हाण असं आहे.

शेणवड पाझर तलाव परिसरात पाटील वस्ती जवळ ही घटना घडली. याबाबत शनिवारी सकाळी आठ वाजता परिसरातील नागरिकांना मृतदेह आढळून आल्याने त्यांनी घोटी पोलिसांशी संपर्क साधून यासंदर्भात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली.

याबाबत तपास केल्यानंतर संबंधित तरूणाच्या डोक्यावर अज्ञात आरोपीनी धारदार हत्याराने घाव घालत ठार मारलं आहे. संबंधित घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे करत आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी अशीच एक घटना घडल्याचं समोर आलं होत. हळदीच्या अदल्या दिवशी नवरदेव आपल्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी शेजरच्या गावात गेला होता. रात्र झाली ती घरी न परतल्यामुळे घरातल्यांनी शोध घेतला. मात्र तरी काही शोध न लागल्याने घरातल्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवली. दुसऱ्या दिवशी अर्थात हळदीच्या सकाळी एक मृतदेह अढळला. तो संबंधित वराचा निघाला. त्याची देखील हत्या करण्यात आली होती.

थोडक्यात बातम्या-

“दीदी ओ दीदी या अपमानजनक टिप्पणीला जनतेचं सडेतोड उत्तर”

कडक सॅल्यूट! डाॅक्टर आणि नर्सवर हात उचलण्याआधी हा व्हिडीओ एकदा नक्की पहा

‘अंदाज अपना अपना’, बंगालमध्ये प्रशांत किशोरांनी सांगितलं होतं तसंच झालं

“कोणीही जिंको, देशाचं प्रचंड नुकसान होत असताना अशा विजयाचा काहीच फायदा नाही”

भारतनानांना जे जमलं ते मुलाला राखता आलं नाही, पंढरपुरात भगीरथ भालकेंना धक्का!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More