Top News देश महाराष्ट्र मुंबई

टूल-किट प्रकरणातील संशयितांची न्यायालयात धाव; न्यायालयाने दिला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय!

Photo Courtesy- Facebook/Disha Ravi

मुंबई | स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने प्रसारित केलेल्या त्या टूल किट प्रकरणात अनेक नवनवीन गोष्टींचा उलगडा होत आहे. कालच त्याचं महाराष्ट्र कनेक्शन उघड झालं होतं. बीडच्या शंतनु मुळूक या तरुणावर हे टूल किट बनवल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

कृषी कायद्यांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला भडकवण्यासाठी आणि डिजिटल हल्ला करण्यासाठी योजलेल्या गोष्टी ज्या गुगल डॉक्युमेंटमध्ये ठेवण्यात आल्या होत्या ते टूल किट एडिट करून ते समाज माध्यमांवर पसरवण्याप्रकरणी दिशा रवीला शनिवारी अटक झाली. या प्रकरणाने आता गंभीर वळण घेतलंय.

शंतनुच्या घरी पोलीस पोहोचले असताना तो फरार होता. आई वडिलांनाही त्याच्याबद्दल कोणतीही माहिती नव्हती, पण त्याने सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात धाव घेऊन अटकपूर्व जामीन अर्ज केला. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्ती कंकणवाडी यांनी हे प्रकरण दिल्ली न्यायालयात प्रलंबित असल्याने गुणवत्ता निश्चित करण्याचे अधिकार त्याच न्यायालयाला असल्याचं सांगत 10 दिवसांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

न्यायालयाने मूळ प्रकरणावर काहीही न बोलता आणि गुणवत्ता न ठरवता जामीन अर्जाला मंजुरी दिली. दिल्ली न्यायालयाने निकिता जेकब आणि शंतनु मुळूक यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर मुंबई आणि बीड येथे पोलिसांचं पथक रवाना झालं. निकिता जेकबनेही अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयात केल्याने आज होणाऱ्या सुनवाईनंतरच तिच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर, राहिले फक्त एवढे दिवस!

200 जणांविरुद्ध गुन्हा दाखल, धरपकड सुरु; पुण्यातील या कारवाईनं गुंडांचे धाबे दणाणले!

नवीन कृषी कायदे लहान शेतकऱ्यांच्याच फायद्याचे- नरेंद्र मोदी

आयसीएआयचा ‘सीए’ करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दणका, वाचा सविस्तर!

उपमुख्यमंत्रीपदाबाबत बाळासाहेब थोरात यांचं मोठं वक्तव्य, म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या