Loading...

#तूरघ्यातूर मागणी सरकारने ऐकली, ३१ मेपर्यंत १ लाख टन तूर घेणार

नवी दिल्ली | महाराष्ट्रातील तूर खरेदी करण्याची मुदत ३१ मे पर्यंत वाढवण्यात आलीय, तसेच नाफेडमार्फत सरकार आणखी १ लाख टन तुरीची खरेदी करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह यांची भेट घेतली. या भेटीत हा निर्णय घेण्यात आला.

2 मे रोजी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार 22 एप्रिलपर्यंत नोंदणी झालेली तूर 7 दिवसांच्या मुदतीत जिल्हा प्रशासनाने अधिक मनुष्यबळ दोन पाळ्यांमध्ये कार्यरत ठेवून खरेदीप्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. ही मुदत उद्या 9 मे रोजी संपणार आहे.

Loading...