‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानमधील ५ कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा; नावं समोर

Operation Sindoor

Operation Sindoor | जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप भारतीय (Indian) पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. या हल्ल्याला जबाबदार असलेल्या कोणत्याही दहशतवाद्याला सोडणार नाही, अशी कठोर भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी घेतली होती. यानंतर १५ दिवसांनी, ७ मे रोजी, भारताने (India) ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) ९ दहशतवादी  तळांना लक्ष्य केले. या धडक कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त असून, त्यात पाकिस्तानमधील  ५ मोठ्या आणि कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश असल्याने पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मारले गेलेले ५ प्रमुख दहशतवादी

मुदस्सर खादियान खास (Mudassar Khadian Khas) उर्फ मुदस्सर उर्फ अबू जुंदाल : हा लष्कर-ए-तैयबा (Lashkar-e-Taiba) या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता. धक्कादायक बाब म्हणजे, त्याची अंत्ययात्रा एका सरकारी शाळेत पार पडली, ज्याचे नेतृत्व जमात-उद-दावाचा (Jamaat-ud-Dawa) प्रमुख आणि जागतिक दहशतवादी हाफिज अब्दुल रौफ (Hafiz Abdul Rauf) याने केले. या अंत्ययात्रेत पाकिस्तानी लष्कराचे (Pakistan Army) लेफ्टनंट जनरल (Lieutenant General) आणि पंजाब पोलिसांचे (Punjab Police) आयजी (IG) उपस्थित होते, यावरून पाकिस्तानचा दहशतवाद्यांशी असलेला संबंध पुन्हा एकदा उघड झाला आहे.

हाफिज मुहम्मद जमील- हा दहशतवादी (terrorist) जैश-ए-मोहम्मद (Jaish-e-Mohammed) या संघटनेशी संबंधित होता आणि तो मौलाना मसूद अझहरचा (Maulana Masood Azhar) मोठा मेहुणा होता. मोहम्मद युसूफ अझहर- हा देखील जैश-ए-मोहम्मद संघटनेचाच दहशतवादी (terrorist) होता आणि मौलाना मसूद अझहरचा (Maulana Masood Azhar) दुसरा मेहुणा होता. तो आयसी-८१४ (IC-814) विमान अपहरण  प्रकरणात फरार होता आणि भारताला  हवा असलेला दहशतवादी  होता.

खालिद उर्फ अबू आकाशा- हा दहशतवादी लष्कर-ए-तैयबाशी (Lashkar-e-Taiba) संबंधित होता. तो जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी होता आणि अफगाणिस्तानातून (Afghanistan) शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यातही त्याचा मोठा हात होता. त्याचे अंत्यसंस्कार फैसलाबादमध्ये झाले आणि त्यात पाकिस्तानी लष्कराचे (Pakistan Army) वरिष्ठ अधिकारी तसेच फैसलाबादचे (Faisalabad) उपायुक्त उपस्थित होते.

मोहम्मद हसन खान- हा दहशतवादी जैश-ए-मोहम्मद संघटनेशी संबंधित होता. तो पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) जैशचा (Jaish) ऑपरेशनल कमांडर आणि मुफ्ती असगर खान काश्मिरी याचा मुलगा होता. जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) दहशतवादी (terrorist) हल्ल्यांचे नियोजन आणि समन्वय साधण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती. लष्कर-ए-तैयबाचे (Lashkar-e-Taiba) मुख्यालय पाकिस्तानच्या पंजाब (Punjab) प्रांतातील मुरीदके  येथे आहे, जे लाहोरपासून (Lahore) ३० किलोमीटर अंतरावर आहे. भारताने (India) या मुख्यालयावरही लक्ष्यित हल्ला केला. हीच ती दहशतवादी (terrorist) संघटना आहे जिने २००८ साली मुंबईत (Mumbai) भीषण दहशतवादी (terrorist) हल्ला घडवला होता. संयुक्त राष्ट्रासह (United Nations) अनेक देशांनी लष्कर-ए-तैयबा या संघटनेवर बंदी घातली आहे. भारताच्या (India) या कारवाईत जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-e-Mohammed) प्रमुख मसूद अझहरच्या कुटुंबातील १० जणांचाही खात्मा झाल्याचे वृत्त आहे.

Title : Top 5 Terrorists Killed In Operation Sindoor

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .