महाराष्ट्र मुंबई

महाराष्ट्रात आत्तापर्यंत ‘इतक्या’ हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज- राजेश टोपे

मुंबई | महाराष्ट्रात आत्तापर्यंत 93 हजार कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसंच प्लाझ्मा थेरपीमुळेही अनेक लोक बरे होत आहेत, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.

प्लाझ्मा थेरेपी महाराष्ट्रात यशस्वी ठरते आहे. 10 पैकी 9 रुग्णांना या थेरेपीमुळे फरक पडतोय. तसेच Remdesivir आणि Favipiravir ही दोन्ही औषधं येत्या दोन दिवसात सगळ्या जिल्ह्यांमध्ये उपलब्ध होतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ‘एएनआय’ने यासंदर्भातलं वृत्त दिले आहे.

महाराष्ट्रात बुधवारी 4 हजार 337 जण करोना बाधित होते तर बुधवारी 2243 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.  राज्यातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या 1 लाख 80 हजार 298 इतकी झाली आहे.

अर्धा किलोमीटरसाठी 5 ते 8 हजार रुपये आकारले जातात. त्यामुळे खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. जर कुणी ठरलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारला तर त्याचे लायसन्स रद्द करुन त्याच्यावर गुन्हाही दाखल केला जाणार, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.

ट्रेंडिंग बातम्या-

“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”

लिओनेल मेस्सीचा आणखी एक विक्रम, कारकिर्दीत 700 व्या गोलची नोंद

महत्वाच्या बातम्या-

सोन्याच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक; प्रतितोळा सोनं 50 हजारांच्या पार

चौथीची पोरगी सांगेल, ठाकरे सरकारचं काही खरं नाही- चंद्रकांत पाटील

राज्यभरातील खासगी रुग्णवाहिका ताब्यात घेणार- राजेश टोपे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या