बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘या’ जिल्ह्यातील धबधबे व इतर पर्यटनस्थळी जाण्यास बंदी!

ठाणे | महाराष्ट्रात सध्या कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत असली तरी धोका अद्याप संपलेला नाही. तरीही नागरिक निर्धास्तपणे पर्यटन स्थळावर सामाजिक अंतराचा फज्जा उडवून वावरत असल्याचं पाहायला मिळत आहे. ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर जाण्यासाठी नागरिकांना बंदी घालण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळावर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. तसेच होणाऱ्या गर्दीमुळे कोरुना नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा पाहायला मिळत असल्याने प्रशासनाने पर्यटनस्थळावर नागरिकांना जाण्यास पूर्णपणे बंदी घातली आहे. कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येत असताना नागरिक पर्यटनस्थळावर जाऊन नियमांचे उल्लंघन करत असल्याने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.

ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धबधबे नद्या आणि इतरही पर्यटन स्थळ आहेत. सध्या पावसाळी वातावरण असल्यामुळे नागरिक कुटुंबीयांसह पर्यटन स्थळावर गर्दी करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आदेश जारी करून सर्व पर्यटन स्थळांवर पर्यटनासाठी व फिरायला जाण्यासाठी बंदी घातली आहे.

ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशानुसार पोलिसांनी ही फिरायला जाणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनीही घराबाहेर न पडता प्रशासनाला सहकार्य करून नियमांचं पालन करावं असं आवाहन करण्यात येत आहे.

 

थोडक्यात बातम्या –

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More