Tourist Places l पावसाळा आला की सर्वांना चाहूल लागते ती मनसोक्त फिरायला जाण्याची. अशातच आता पावसाळा ऋतू सुरु झाला आहे. तर तुम्ही यंदाच्या पावसाळ्यात महाराष्ट्रातील अशा काही गडकिल्ल्यांना आवर्जून भेट देयला हवी आहे. कारण पावसाळ्यात गडकिल्ल्यांवर एक वेगळाच अनुभव अनुभवायला मिळतो.
या गडकिल्ल्यांना नक्की भेट द्या :
हरिहर किल्ला : पावसाळ्यात जर तुम्हाला ट्रेकिंगला जायचं असेल तर त्र्यंबकेश्वरजवळील हरिहर किल्ला अतिशय सुंदर आहे. हरिहर किल्ल्याच्या पायऱ्या चढाईसाठी अवघड असल्या तरी उंचावरुन दिसणारं निसर्गाचं नयनरम्य दृश्य डोळ्याची पारणं फेडणार आहे. हरिहर किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी दूरहून पर्यटक येत असतात. इगतपुरी हे ठिकाण त्र्यंबक पट्ट्यातील एक गड आहे. त्यामुळे येथे पावसाचे प्रमाण देखील जास्त असते.
कळसुबाई : ज्यांना ट्रेकिंगला साहसी आणि आव्हानात्मक गड चढायला आवडतं अशा लोकांसाठी कळसुबाई हे उत्तम ठिकाण आहे. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात हे शिखर आहे. पावसाळा सुरू झाली की पर्यटकांची आणि गिर्यारोहकांची अफाट गर्दी कळसुबाई शिखरावर होते. पावसाळ्यात कळसुबाई शिखरावर गेलात तर धुक्यांची चादर पसरलेली दिसेल.
Tourist Places l ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी सर्वात्तम ठिकाण :
हरिश्चंद्रगड : ट्रेकिंगचं वेड असलेला प्रत्येकजण आयुष्यात एकदा तरी हरिश्चंद्रगडावर जाऊन येतोच. या गडावर असलेले शिवमंदिर, पुष्पकर्णी व तेथील गुहेत घालवलेली रात्र हे सगळं प्रत्येक ट्रेकर्सने अनुभवलचं पाहिजे. हरिश्चंद्रगड गडावरील कोकणकड्याला जाणं हा एक अद्भूत अनुभव आहे.
कोरीगड किल्ला : लोणावळा शहरापासून साधारण 25 किलोमीटरवर कोरीगड किल्ला आहे. कोरीगड किल्ला हा ट्रेकिंगसाठी अतिशय सोपा आहे. चिमुकल्यांपासून ते मोठ्यांपर्यंत कोणीही हा किल्ला अगदी सहजपणे सर करू शकतात. पहिल्यांदाच ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हे ठिकाण अतिशय उत्तम आहे. पावसाळ्यातील अल्हाददायक वातावरण अनुभवण्याची संधी कोरीगड किल्लावर मिळते.
News Title : Tourist Fort In Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या-
बुलेट लव्हर्ससाठी खुशखबर; रॉयल एनफिल्डच्या या बाईक लवकरच लाँच होणार
राष्ट्रवादीचा 25 वा वर्धापन दिन; शरद पवार सरप्राईज देणार?
नरेंद्र मोदी यांच्या नव्या सरकारमध्ये कोणकोणत्या नेत्यांनी घेतली शपथ; जाणून घ्या एका क्लिकवर
हवामान विभागाचा ‘या’ जिल्ह्यांना महत्वाचा इशारा
नरेंद्र मोदी पंतप्रधान होताच झाला दहशतवादी हल्ला; काँग्रेसच्या बड्या नेत्याने साधला निशाणा