बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘टुरिस्ट गाईड’ बनायचंय? राज्य सरकारचा हा ऑनलाईन कोर्स लवकरच सुरू होणार; सविस्तर वाचा…

मुंबई | लॉकडाऊनच्या काळात राज्यातील पर्यटन व्यवसायाला खिळ बसली होती. अनेक नागरिकांच्या नोकरीवर गदा आली तर काहींना आपला रोजगार गमवावा लागला. महाराष्ट्र पर्यटन संचालनालयानं या पार्श्वभूमीवर आता एक नवीन योजना आखली आहे. पर्यटन क्षेत्राची आवड असणाऱ्या 1000 उमेद्वारांना केंद्र सरकारच्या ऑनलाईन ‘आयआयटीएफ टुरिजम फॅसिलिटेटर सर्टिफिकेशन प्रोग्राम’ अंतर्गत पर्यटक मार्गदर्शक प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे.

रोजगारासोबतच सध्या थंडावलेल्या पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी राज्य सरकारनं ही स्तुत्य योजना हाती घेतली आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेद्वाराला ‘टुरिस्ट गाईड’ म्हणून प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. प्रमाणपत्र प्राप्त गाईड्सना राज्यतील विवीध ठिकाणी काम करण्याची संधी मिळणार असल्याची माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली आहे.

ठराविक मॉड्युलसह हा उपक्रम ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध असणार आहे. या कोर्ससाठी 2000 रुपये शुल्क असून परिक्षेसाठी 500 रुपये मोजावे लागणार आहेत. विशेष म्हणजे पर्यटन विभागाकडून उमेद्वाराला 2000 रुपये  कोर्स पूर्ण केल्यानंतर परत करण्यात येणार आहे. कोर्ससाठीची पात्रता 18 ते 40 वर्ष असून उमेद्वाराने 12 वी उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.

दरम्यान कोर्स पूर्ण केल्यानंतर इंटर्नशीपची संधीही उमेद्वारासाठी उपलब्ध आहे. राज्य सरकारच्या http://iitf.gov.in संकेतस्थळावर किंवा [email protected] या ईमेलवर अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचं आवाहन पर्यटन विभागानं केलं आहे. उमेद्वाराच्या आवडीनुसार हा कोर्स उपलब्ध असल्यानं पर्यटन विभागाच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळेल अशी राज्य सरकारला आशा आहे.

थोडक्यात बातम्या-

नाना पटोलेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र, म्हणाले… ‘ही दरोडेखोरी आहे’

तब्बल 500 दिवसांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार ‘या’ देशाचा दौरा

रूसलेल्या गर्लफ्रेंडला खूश करण्यासाठी कायपण…; तरूणाने केला ‘हा’ कारनामा

शाहीनबाग आंदोलनाला तापसी, अनुरागने पैसा पुरवला- कंगना रनौत

बॉलिवूडमधील दिग्गज दडपशाहीविरोधात गप्प का आहेत?- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More