बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गजराज भडकले अन् पर्यटकांची उडाली तारांबळ! पुढे काय झालं बघाच; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | रोज अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. या अनेक व्हिडीओ पैकी मोजकेच व्हिडीओ असतात जे चर्चेचा विषय ठरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पर्यटकांना बघताच हत्तीला राग अनावर झाला आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. (Viral Video)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राणी संग्रहालय, जंगल सफारी हे सर्व बंद ठेवण्यात आलं होतं. नियमांमध्ये शिथीलता मिळताच जंगल सफारी पुन्हा सुरू झाली खरी पण पर्यटकांना समोर बघताच हत्तीला राग अनावर झाला आणि त्याने थेट पर्यटकांच्या गाडीवरच हल्ला चढवला.

काही पर्यटक एका गाडीत बसून जंगल सफारीचा आनंद घेत होते. तितक्यात समोर काही हत्तींचा कळप आला. पर्यटकांना बघताच कळपातील एका हत्तीला राग आला आणि तो थेट पर्यटकांच्या दिशेने धावू लागला. हत्ती रागात येतोय दिसताच पर्यटकांना मात्र घाम फुटला आणि ते सैरभैर पळु लागले.

हत्तीने थेट येऊन पर्यटकांच्या गाडीला धडक दिली आणि गाडी आडवीच केली. हत्तीच्या हल्ल्यात कोणालाही दुखापत झाली नाही पण हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या- 

“कोण राहुल गांधी?, मी त्यांना ओळखत नाही”

Omicronचा धोका वाढला! द.आफ्रिकेतून आलेल्या महिलेने केलंं असं काही की…

“पुण्यात केवळ शनिवारवाडाच आहे का?”, अमोल कोल्हेंचं ट्विट चर्चेत

शिवसेनेची नेमकी भूमिका काय? तिसऱ्या आघाडीबाबत स्पष्टच सांगितलं…

PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; आता मुख्य परीक्षा ‘या’ तारखेला होणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More