Chocolate | लहान असो किंवा मोठे चॉकलेट सर्वांनाच आवडते. चॉकलेटचे जगभरात असंख्य प्रकार आहेत. त्यामुळे काही निमित्त असो किंवा नसो चॉकलेट हे खूप आवडीने खाल्ले जाते. लहान मुलांना तर चॉकलेटचे आमिष हमखास दिले जाते. त्यांनी अभ्यास करावा, काही कामे ऐकावी म्हणून पालक त्यांना चॉकलेटचे आमिष दाखवतात. त्यामुळे चॉकलेट (Chocolate) खाण्यासाठी काही निमित्त असावेच, असे नाही.
मित्र-मैत्रिणी भेटल्यावर एकमेकांना चॉकलेट देतात. प्रेमी आपल्या प्रेयसीला चॉकलेट देऊन आपलं प्रेम व्यक्त करतो. त्यामुळे चॉकलेट खाणाऱ्यांची संख्या जगभरात खूप मोठी आहे. मात्र, ही बातमी वाचून तुम्ही चॉकलेट खायचे की नाही?, याचा नक्की विचार कराल.
चॉकलेटबाबत धक्कादायक माहिती समोर
एका रिसर्चमध्ये चॉकलेटबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांना एका रिसर्चमध्ये अनेक चॉकलेट उत्पादनांमध्ये टॉक्सिक हेवी मेटल्स (Heavy Metals) आढळून आले आहेत. हे मेटल्स आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आणि धोकादायक ठरू शकतात.
या रिसर्चमध्ये चॉकलेट (Chocolate) उत्पादनांमध्ये टॉक्सिक हेवी मेटल्सचं प्रमाण आणि कॅडमियम आढळून आलं आहे, जे आरोग्यास खूप घातक ठरू शकते. आता यामध्ये अजून काय खुलासा झालाय, याबबत अधिक जाणून घेऊयात.
चॉकलेट प्रॉडक्टमध्ये आढळले टॉक्सिक हेवी मेटल्स
या रिसर्चमध्ये काही शास्त्रज्ञांनी तब्बल आठ वर्षे कोकोपासून बनवलेल्या डार्क चॉकलेटसह 72 प्रोडक्ट्सचा अभ्यास केला. यामध्ये त्यांना चॉकलेटपासून (Chocolate) बनवलेल्या 43 टक्के उत्पादनांमध्ये टॉक्सिक हेवी मेटल्स आढळून आले. तर, 35 टक्के उत्पादनांमध्ये कॅडमियम आढळलं.
कॅडमियम किडनी आणि हाडांसाठी हानिकारक आहे. याचा शरीराशी संपर्क राहिल्यास हाडं कमकुवत होऊ शकतात. याशिवाय किडनीचे अनेक आजार होऊ शकतात. काही चॉकलेटमध्ये हे आढळून आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. हा रिसर्च वेगवेगळे ब्रँड आणि चॉकलेटच्या प्रकारांवर आधारित होता. अनेक प्रकरणांमध्ये, टॉक्सिक हेवी मेटल्सचं प्रमाण खूप जास्त आढळलं.त्यामुळे चॉकलेट खाणे आता शरीरसाठी घातक असल्याचे म्हटले जात आहे.
News Title : Toxic heavy metals found in chocolate products
महत्वाच्या बातम्या-
“माझ्या नादाला लागू नको, फडणवीसांचं राजकीय करीअर..”; जरांगेंनी भाजप नेत्याला झापलं
‘या’ धक्कादायक कारणामुळे बांगलादेशच्या पंतप्रधान देश सोडून पळाल्या; दिला राजीनामा
दुचाकी बाईक चालवण्याआधी ही बातमी वाचा; या लोकांवर होणार थेट कारवाई
गोविंदाच्या भाचीने सोशल मीडियावर घातला धूमाकुळ, पतीसोबतचे ते फोटो व्हायरल
भाजपचं टेन्शन वाढलं; विधानसभेसाठी मनसेचे दोन उमदेवार जाहीर, पाहा कोण आहेत?