Top News तंत्रज्ञान देश

आता ट्रॅक्टरही सीएनजीवर, वर्षाला एक लाख रूपये वाचणार!

Photo Credit- PIB India Twitter

नवी दिल्ली | डिझेलचे भाव गगनाला भिडत असतांना ट्रॅक्टरचा वापर करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. भारतीय बाजारात इलेक्ट्रीक आणि सीएनजी गाड्यांना चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे. आता ट्रॅक्टरमध्येही सीेएनजी लावण्यात येत आहे.

प्रथम सीएनजीवर चालणाऱ्या ट्रॅक्टरचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे. या उद्धाटन सोहळ्यात केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, नरेंद्रसिंग तोमर, पुरुषोत्तम रुपाला जनरल (सेवानिवृत्त) व्ही. सिंग  उपस्थित असणार आहे. सीेएनजी ट्रॅक्टरच्या वापराने शेतकऱ्यांना चांगलाच फायदा होणार आहे. शेती उत्पादनासाठी लागणारा आधिकचा खर्च कमी होणार आहे.

रावमट टेक्नो सोल्यूशन आणि टॉमासेटो अचिले इंडियाव्दारा संयुत्कपणे सीेएनजी ट्रॅक्टरची निर्मिती करण्यात आली आहे. या सीेएनजी ट्रॅक्टरच्या वापराने इंधनासाठी लागणाऱ्या खर्चात वर्षाकाठी एक लाख रुपयांची बचत होणार आहे.

सीएनजी हे एक पर्यावरणपूरक इंधन आहे. या इंधनामध्ये ष्रदुषणाचे घटक कमी प्रमाणात आहेत. हे इंधन स्वस्त आहे. या इंधनाचा मायलेज डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा चांगलं आहे. बायो-सीएनजी उत्पादनासाठी शेतातील गवताचा कच्च्या मालाच्या स्वरूपात वापर केला जाण्याचा अंदाज आहे.

सीेएनजी डिझेलच्या तुलनेत ७० टक्के कमी कार्बन उत्सर्जन करतं. प्रदुषणावर मात करण्यासाठी इलेक्ट्रीक आणि सीएनजीचा वापर अधिक भर दिला जात आहे. आता ट्रॅक्टरमध्येही सीएनजी येत असल्याने याचा शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला चांगलाच फायदा होणार आहे.

थोडक्यात बातम्या

जगातील सर्वात जबरदस्त इलेक्ट्रीक कार लाँच; जाणून घ्या काय आहे किंमत

नगरसेवकाच्या हत्येचं धक्कादायक CCTV फुटेज; हलक्या काळजाच्या लोकांनी पाहू नये!

“राज्यपाल स्वतःच्याच कासोट्यात पाय गुंतून सारखे का पडत आहेत”

आता येतेय सर्वात स्वस्त स्कॉर्पिओ; किंमत असणार फक्त….

‘या’ कारणामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात अद्याप कारवाई नाही!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या