Pune l पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पुणे शहरात सध्या मेट्रोचे काम जलद गतीने सुरु आहे. त्यामुळे मेट्रोच्या दोन्ही मार्गांचे काम पूर्ण झाल्यानंतर पुणेकरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अशातच आता मेट्रो प्रकल्पाच्या या कामांमुळे पुणे शहरातील वाहतुकीत काही प्रमाणात बदल करण्यात आले आहेत.
पुणेकरांनो पर्यायी मार्गाचा वापर करा :
यासंदर्भात अधिक माहिती अशी की, पुणे शहरातील मेट्रोच्या दोन मार्गांचे काम संध्या जोमाने सुरु आहे. मात्र या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पोलिसांकडून वाहतुकीत काहीप्रमाणात बदल केला आहे. यामध्ये पुणे विद्यापीठ ते शिवाजी नगर संचेती चौक या दरम्यान पाच मेट्रोच्या स्टेशनची कामे सुरु होणार आहेत. यामुळे ससून हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी पुणे युनिव्हर्सिटी ते शिवाजी नगर संचेती चौक दरम्यान बदल केला आहे.
याशिवाय औंध, बाणेर वाकड या रस्त्याने जाणाऱ्या गणेश खिंड विद्यापीठ मार्ग विद्यापीठ चौकातून जाणाऱ्या रस्त्यासाठी देखील बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे या परिसरात जाणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले आहे.
Pune l असे असणार पर्यायी मार्ग :
नागरिकांना पुणे विद्यापीठ चौकामधून खडकी रेंज हिल मार्गे शिवाजी नगर संचेती चौकाकडे जाता येणार आहे. मात्र ही गोष्ट लक्ष घ्या की, संचेती चौक शिवाजी नगरकडून पुणे विद्यापीठ या ठिकाणी जाणारा गणेश खिंड रस्ता नेहमी प्रमाणे सुरु राहणार आहे.
केंद्र सरकारने पिंपरी चिंचवड महानगरपालिका ते निगडी मार्गाच्या विस्तारास मंजुरी दिली आहे. मात्र स्वारगेट ते कात्रज या मार्गाच्या विस्तारास अद्यापही मंजुरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे या मार्गाच्या मंजुरीचा प्रस्ताव देखील महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे. त्यानंतर तो प्रस्ताव केंद्र शासनाकडे जाणार आहे.
News Title – Traffic Change In Pune City Due To Metro Works
महत्त्वाच्या बातम्या
इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा फॉर्मुला ठरला!… तर यांची वर्णी लागणार
मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी; रेल्वेने प्रवास करत असाल तर थांबा…अन्यथा
आज या राशीच्या व्यक्तींना धन प्राप्तीचे योग जुळून येतील
सौरव गांगुलीचा गौतम गंभीरला विरोध?; सौरव गांगुलीच्या पोस्टने खळबळ
अडचणीत सापडलेल्या आव्हाडांची छगन भुजबळांकडून पाठराखण, म्हणाले…