बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…म्हणून पोलिसांनी ढिगभर हेडफोन जाळले, तुमचे हेडफोन सांभाळा!

मुंबई | हेडफोन्स घालून गाड्या चालवणं कायद्यानं गुन्हा आहे. मात्र भारतामध्ये हेडफोन्स घालून भरधाव वेगाने गाड्या चालवणाऱ्यांचे प्रमाण काही कमी नाही. अगदी दुचाकी, चारचाकी असो किंवा रिक्षा अनेक चालक कानामध्ये हेडफोन्स टाकून गाड्या चालवताना दिसतात.

मीरा रोडमधील रिक्षा चालकांना अशाप्रकारे हेडफोन्स घालून रिक्षा चालवणं जास्तच महागात पडलं आहे. येथील पोलिसांनी हेडफोन्स घालून गाड्या चालवणाऱ्या रिक्षावाल्यांचे हेडफोन्स जप्त करुन ते जाळले आहेत.

मीरा रोडमधील वाहतूक पोलिसांनी हेडफोन्स घालून रिक्षा चालवणाऱ्यांविरोधात मागील काही दिवसांपासून एक मोहीम राबवली होती. हेडफोन्स घालून रिक्षा चालवणाऱ्यांना दंड करुन त्यांचे हेडफोन्स जप्त करण्यास पोलिसांनी सुरुवात केली.

दरम्यान, पोलिसांनी राबवलेल्या या हेडफोन्सविरोधी मोहिमेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

ठाकरे सरकारच्या अर्थसंकल्पावर देवेंद्र फडणवीसांची टीका; म्हणतात…

अर्थसंकल्प नव्हे, अजित पवारांनी केवळ पोकळ भाषण केलं- देवेंद्र फणडवीस

मह्लाच्या बातम्या-

अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांकडून झाली ‘ही’ चूक

कोरोनाचा आत्तापर्यंतचा सर्वात धक्कादायक व्हिडीओ!

बेळगावमधील मराठी बांधवासाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More