बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

खड्ड्यांमध्ये दुचाकी घसरल्याने वाहतूक पोलिसाला जीव गमवावा लागला

मुंबई | अंबरनाथ येथिल महत्मा गांधी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी निघालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कल्याण-बदलापूर या राज्य महामार्गावरील खड्ड्यांमुळे या पोलिस कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला.

पोलिस कर्मचारी संजीव पाटील हे महात्मा गांधी चौकातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी निघाले असतानाच त्यांची दुचाकी रस्त्यावरील खड्ड्यात आदळून घसरली. मागून येणाऱ्या ट्रकने त्यांना चिरड्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर मोठमोठे खड्डे आहेत. पोलिस कर्मचाऱ्याच्या अपघाताने रस्त्यावरील भीषण वास्तव समोर आणलं आहे.

दरम्यान, कल्याण-बदलापूर राज्य महामार्गावर गेल्या पाच वर्षात झालेल्या अपघाताने आतापर्यंत 30 बळी घेतले असल्याची माहिती मिळत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘ही’ अभिनेत्री म्हणते… मैं सुषमा स्वराज बनना चाहती हूँ|

-चंद्रकांत पाटलांसह मुख्यमंत्री घेणार पूरपरिस्थितीचा आढावा

-आज घुमणार आवाज,”मेरे प्यारे भाईयो और बहनो…”

-मुख्यमंत्र्यांनी यात्रेच्या नादात राजधर्म विसरु नये- अशोक चव्हाण

-भाजप आमदाराच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर रिचा चड्डा संतापली; म्हणते…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More