पुणे महाराष्ट्र

लाच स्वीकारताना महिला वाहतूक पोलीस कॅमेरात कैद, व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुणे | पिंपरीतील साई चाैक आणि शगुन चौकात वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत होती. या कारवाई दरम्यानची एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

महिला पोलीस कर्मचारी या वाहतूक पोलीस अधिकारी जवळ असताना त्यांची नजर चुकवून लाच घेत असल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंठे यांना संबंधित प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, यासंबंधी संबंधित वाहतूक पोलीस कर्मचारी यांना लेखी खुलासा द्यावा, असे आदेशही सुधीर हिरेमठ यांनी दिलेत.

 

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! आंदोलनात सहभागी संत बाबा रामसिंगांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या!

“पायाला भिंगरी बांधल्यासारखे शरद पवार आजही काम करत आहेत”

छगन भुजबळांच्या बोलण्याकडे आपण फारसं लक्ष देत नाही- उदयनराजे भोसले

ऑस्ट्रेलियावरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; ‘हा’ महत्त्वाचा खेळाडू संघाबाहेर

क्रूरतेचा कळस! पिंपरी चिंचवडमध्ये भटक्या कुत्र्याला इमारतीवरून फेकून ठार मारलं

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या