बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मोठी बातमी! रायगडमधील तळई गावात भीषण आणि सर्वात मोठी दुर्घटना; 32 जणांचा मृत्यू

रायगड | संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थैमान घातलं आहे. कोकणात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सातारा आणि रायगड जिल्ह्यातील काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. यात सर्वात मोठी दुर्घटना ही तळई गावात घडली असून या घटनेने हाहाकार माजला आहे.

रायगडमध्ये पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. महाड तालुक्यातील तळई गावात ही भीषण दुर्घटना घडलीये. या दुर्घटनेत 32 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एनडीआरएफ आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं आहे.

दरड कोसळल्याची घटना घडताच स्थानिकांनी  धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली. स्थानिकांनी मातीच्या ढिगाऱ्याखालून 32 जणांचे मृतदेह बाजूला काढले. तर 80 ते 85 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुरुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याची माहिती आहे. महाड तालुक्यातील तळई गाव हे डोंगर कपारीमध्ये वसलेले आहे. या गावावर दरड कोसळल्याने दरडीखाली 35 घरे दबली गेली.

दरम्यान, साताऱ्यात देवरुखवाडीयेथेही मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालं आहे. ढिगाऱ्याखाली काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पाच घरं मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली. मात्र नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं आहे. 27 नागरिकांची सुटक करण्यात आलेली असून 2 महिला मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या आहेत.

थोडक्यात बातम्या- 

राज्यात पूर आलाय तरीही उद्धव ठाकरे घरात, त्यांनी आता घराबाहेर पडावं- चंद्रकांत पाटील

पावसामुळे पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

साखर झोपेत असताना कोसळली इमारत; दुर्घटनेत 3 ठार तर 7 जखमी

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला; भिडे पूल पाण्याखाली

साताऱ्यातील पाटणमध्ये घरांवर दरड कोसळली, तीन कुटुंबातील लोक रात्रीपासून बेपत्ता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More