बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काळीज पिळवटून टाकणारा अपघात; वाढदिवसाच्या दिवशी ओढावलं मरण

पुणे | वाढदिवसा दिवशीच पुण्यातील मंचरच्या भावंडांवर काळाने घाला घातला आहे. भरधाव वेगाने आलेल्या बसने दुचाकीला धडक दिल्याने दोन भावडांचा मृत्यू झालाय. मावशीकडे आपला वाढदिवस साजरा करून आपल्या घरी वाढदिवस साजरा करण्यासाठी जात असताना पुणे नाशिक रस्तावर झालेल्या अपघातात मावस भावडांचा मृत्यू झाला आहे.

रोहित गोपीनाथ रासकर ( वय 19 रा. तळेगाव ढमढेरे ) आणि प्रज्वल गणेश भास्कर ( वय 13 रा. जुन्नर ) असं अपघातात ठार झालेल्या मुलांची नावं आहेत. बसच्या चालकास मृत्यूस जबाबदार पकडून त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे. मंचर पोलीसांच्या माहितीनुसार या प्रकरणी नवनाथ रामदास रासकर रा. तळेगाव ढमढेरे यांनी फिर्याद दिली आहे.

पुतण्या रोहित रासकर हा दुचाकीवर आपल्या मावशीला भेटण्यासाठी गेला होता. रोहित येताना त्याच्या मावस भावाला घेऊन निघाला होता. पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाववरून मंचरकडे जाताना त्यांना बसने जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आलं.

दरम्यान, उपचारापूर्वीच दोघांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या घटनेनं हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती समजताच दोन्ही कुटुंबाच्या घरी शोकाकुल वातावरण झालं आहे.

थोडक्यात बातम्या – 

OnePlus 9 घेण्याचा विचार करताय?, अहो ‘इथे’ अर्ध्या किंमतीत मिळतोय!

“राज ठाकरेंना भारी प्रसिद्धीची हौस, पवारांवर टीका केली की प्रसिद्धी मिळतेच”

“…तर दोन महिन्यात मी माझ्या पैशांनी बाळासाहेबांचं स्मारक बांधेन”

“भाजपच्या कारभाराला जनता कंटाळलीये, आता जनताच त्यांना योग्य उत्तर देईल”

लस घेतली म्हणून कोरोना होणार नाही हा गैरसमज- अमोल कोल्हे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More