नाशिकमध्ये भीषण अपघात, ओव्हरटेक करण्याच्या नादात कंटेनरची रिक्षाला धडक

Nashik Accident

Nashik Accident l नाशिकच्या द्वारका परिसरात (Nashik Dwarka Flyover) काही दिवसांपूर्वीच झालेल्या भीषण अपघाताची (Tragic Accident) घटना ताजी असतानाच, आता पुन्हा एकदा नाशिकमधून अपघाताची एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. घोटी-सिन्नर महामार्गावर (Ghoti Sinnar Highway) आज (दि. 21) मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षा (Rickshaw) आणि कंटेनर (Container) यांच्यात झालेल्या भीषण धडकेत (Collision) तीन जणांचा जागीच मृत्यू (Death) झाला आहे. मृतांमध्ये एका चार वर्षीय बालिकेचा (Girl Child) समावेश आहे. तर दोन जण गंभीर जखमी (Seriously Injured) झाले असून त्यांना उपचारासाठी (Treatment) तातडीने रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

ओव्हरटेक करण्याच्या नादात घडला अपघात :

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घोटी-सिन्नर महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ (SMBT Hospital) ओव्हरटेक (Overtake) करण्याच्या नादात कंटेनर चालकाने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षातील तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर दोन जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. रिक्षा चालक अमोल विनायक घुगे (Amol Vinayak Ghuge) (रा. कल्याण), स्वरा अमोल घुगे (Swara Amol Ghuge) (4), मार्तंड पिराजी आव्हाड (Martand Piraji Awhad) (60) अशी मृतांची नावे आहेत.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी (Locals) तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे रिक्षाचा चक्काचूर (Crushed) झाला.

कंटेनर चालकावर कारवाई :

अपघातानंतर पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात (Custody) घेतले असून पुढील तपास (Investigation) सुरू केला आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक (Traffic) काही काळासाठी ठप्प (Stalled) झाली होती.

नाशिकच्या उड्डाणपूलावरील अपघातातील मृतांचा आकडा नऊवर :

दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) द्वारका चौफुली (Dwarka Chowfully) जवळील उड्डाणपूलावर (Flyover) रविवारी (दि. 12) झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा नऊवर पोहोचला आहे. राहुल साबळे (Rahul Sable) (17) याचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. एकुलता मुलगा गमावल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील मिस्त्रीकाम (Masonry) करून कुटुंबाचा उदरनिर्वाह (Livelihood) करतात.

आई गृहिणी (Housewife) असून पश्चात लहान बहीण (Younger Sister) आहे. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची (Poor) असून अपघातात मुलगा गमावल्याने कुटुंब उद्ध्वस्त (Devastated) झाले आहे. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर अपघातातील इतर गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

News title : Tragic Accident on Ghoti-Sinnar Highway: 3 Killed, Including 4-Year-Old Girl

 

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .