बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंच्या दमदार आवाजातील ‘हर हर महादेव’चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडीओ

मुंबई | कोरोना महामारीनंतर महाराष्ट्रात निर्बंध शिथिल करण्यात येत असून सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. क्रिडा, चित्रपटांचा आनंद 100 टक्के उपस्थितीत आनंद घेता येईल. त्यामुळे आता नागरिक आनंदाच असल्याचं पहायला मिळत आहे.

‘हर हर महादेव’ म्हटलं तरी प्रत्येक मराठी माणसाची छाती अभिमानाने फुलून येते. महाराष्ट्र सरकारनं काही दिवसापूर्वी कोरोनामुळे लावण्यात आलेले चित्रपटगृहावरील निर्बंध हटवले आहेत. प्रेक्षक त्याच्या आवडत्या सिनेमांचा आनंद 100 टक्के उपस्थितीत आनंद घेऊ शकतील. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आवाजात एका चित्रपटाचा टीझर शेअर करण्यात आल्याचं पहायला मिळालं.

‘जेव्हा मायमाऊलीची बेअब्रू आणि मंदिराला तडा देणं गुन्हा नव्हता, जेव्हा सह्याद्रीला कणा नव्हता आणि मराठीला बाणा नव्हता. 350 वर्षानंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे. ही अठरापगड आरोळ्यांची आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे. ‘हर हर महादेव’ अशी राज ठाकरेंच्या आवाजातील वाक्य या टीझरमध्ये ऐकायला मिळतात.

दरम्यान, ‘हर हर महादेव’ हा सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर धुमाकूळ पहायला मिळत आहे. टीझर पेक्षा त्याला दिल्या गेलेल्या व्हाईस ओव्हरनं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्यामुळे राज ठाकेरेंचं कौतुक होत असल्याचं पहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ – 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

थोडक्यात बातम्या – 

सिद्धार्थ शुक्लाच्या सोशल मीडिया अकांऊटमध्ये मोठा बदल, चाहतेही भावूक

‘आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाहीत’; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं

“तुम्ही पाच वर्षात काही केलं नाही आणि आम्हाला 15 दिवसात करायला सांगता”

कोरोनाची चौथी लाट येणार?; ICMR च्या वक्तव्याने सर्वांचं टेंशन वाढलं

‘ओबीसी आरक्षण मिळू नये म्हणून भुजबळांवर कोणाचा दबाव आहे का?’; फडणवीसांचा हल्लाबोल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More