बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

UPSC मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ‘त्या’ 22 उमेदवारांना बार्टीमार्फत ऑनलाईन प्रशिक्षण!

मुंबई | कोरोनाच्या संक्रमणामुळे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणारी नागरी सेवा पुर्व परीक्षा पुढे ढकल्यात आली आहे. आता ती परीक्षा येत्या 10 ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून मागील झालेल्या मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीपर्यंत पोहोचलेल्यांचा आकडा वाढलेला दिसत आहे. या भावी अधिकाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाकडून एक अभिनव उपक्रम राबवण्यात येतो. त्याचा फायदा आता महाराष्ट्रातील 22 उमेदवारांना होणार आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा मुख्य परीक्षा 2020 मध्ये उत्तीर्ण झालेल्या अनुसूचित जातीच्या पात्र 22 उमेदवारांना बार्टी संस्थेमार्फत व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेचे ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच बार्टीमार्फत देण्यात येते. यावर्षीसाठी देण्यात येत असलेल्या या प्रशिक्षणासाठी 10 मे रोजी उद्घाटन करण्यात आलं आहे, अशी माहिती महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.

राज्यातील अनुसूचित जातीच्या पात्र 22 उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणी करिता आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ दिला आहे. राज्यातील अधिकाधिक उमेदवारांची केंद्रीय सनदी अधिकारी पदांवर निवड व्हावी या उद्देशाने उमेदवारांसाठी हा उपक्रम राबवण्यात येतो. या 22 जणांना पुण्यात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

दरम्यान, यंदा कोरोनाच्या पार्श्नभुमीवर हे प्रशिक्षण ऑनलाईन करण्यात येत आहे. यंदा 10 मे ते 13 जून दरम्यान हे उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यात वरिष्ठ केंद्रीय सनदी अधिकारी या उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

कोरोना लसीमुळे सीरम मालामाल; नफ्याचा आकडा ऐकाल तर थक्क व्हाल!

‘जान मी तुझीच आहे पण…’; 17 वर्षीय मुलीचं आत्महत्येपूर्वी बॉयफ्रेंडला पत्र

आक्रमक हार्दिक पांड्याला भारतीय संघातून डच्चू, समोर आलं ‘हे’ कारण

13 वर्षाच्या मुलाकडून 25 वर्षीय मोठ्या भावाची हत्या; अत्यंत धक्कादायक कारण आलं समोर

‘धकधक गर्ल’ माधुरीचा 54वा वाढदिवस; जाणून घ्या माधुरी विषयी काही खास गोष्टी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More