मुंबई | पोलीस खात्यातील तब्बल 150 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये 43 आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने यासंदर्भात आदेश जारी केलाय.
पोलीस महासंचालक यांच्या आदेशानंतर संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती विचारात घेऊन उपरोक्त अधिकारी यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याकरिता कार्यमुक्त करावे व त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीच्या पदावर रुजू होऊन तसा अहवाल शासनास सादर करावा, असं या आदेशात म्हटलं आहे.
150 अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी पोस्टींग देण्यात येत आहे. त्यामध्ये 43 आयपीएस अधिकारी व 107 उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
“योगी आदित्यनाथ दुसऱ्यांना मार्गदर्शन करतात, त्यांनी पहिल्यांदा स्वत:च्या राज्यात लक्ष घालावं”
उत्तर प्रदेशात कायदा सुव्यवस्थेचं राज्य नसून जंगलराज सुरु आहे- बाळासाहेब थोरात
सुसाईड नोट लिहून मराठा आरक्षणासाठी विद्यार्थ्याची आत्महत्या!
श्रीदेवीच्या ‘त्या’ सुपरहिट गाण्यावर अनिल कपूरने केला डान्स, व्हिडीओ व्हायरल!