बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नाशिकचा कायापालट करतो अन्यथा तोंड दाखवणार नाही”; फडणवीसांच्या ‘त्या’ भाषणावर काँग्रेसचं टीकास्त्र

मुंबई | नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेनंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकारण रंगायला सुरुवात झाली आहे. नाशिक महानगरपालिकेत सध्या भाजपची सत्ता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्यावेळी नाशिकमध्ये केलेल्या एका आवेशपूर्ण भाषणाचा व्हिडीओ ट्विट केला आहे.

या भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, ‘महाराष्ट्र बदलतोय, नाशिकही बदलणार अनेक लोकं म्हणतात नाशिकला कोणी वाली नाही. लोकं म्हणतात मी नागपूरचा असल्यानं नागपूर दत्तक घेतलं आहे. पण एकदा माझ्यावर विश्वास ठेवा. मी नाशिकला दत्तक घेत असून या शहराचा चेहरामोहरा बदलेन, पुढच्या 5 वर्षात नागरीकांच्या अपेक्षा पूर्ण करुन दाखवेल. असं घडलं नाही तर मी त्यानंतर तोंड दाखवणार नाही. एक हातात सत्ता द्या मी तुम्हाला विकास देईल, बदल घडवून आणेल अशी गर्जना केली होती’.

हाच धागा पकडत काँग्रेसनं त्यांच्यावर खोचक टिका केली आहे. ‘एकदा पालकत्व घेतल्यानंतर ते असं मध्येच सोडायचं नसतं, देवेंद्र फडणवीस साहेब’, असं लिहुन भाषणाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. त्यामुळे आता भाजपकडून या टीकेला कशाप्रकारे प्रत्युत्तर दिलं जाणार, याकडे सर्वांचच लक्ष लागून आहे. 

दरम्यान, नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे ऑक्सिजनअभावी 22 जणांचा मृत्यू झाल्याची घटना कालच घडली होती. रुग्णालयातील ऑक्सिजन टॅंकमधून गळती झाल्यानं हजारो लीटर लिक्वीड स्वरुपातील ऑक्सिजन वाया गेलं. यावेळी रुग्णालयात अनेक कोव्हिड रुग्णांवर उपचार सुरु होते. ऑक्सिजनच्या प्रेशरमुळं नोझल तुटून ही ऑक्सिजन गळती झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

थोडक्यात बातम्या –

दिलासादायक! ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टनमला पोचली, लवकरच महाराष्ट्रात परतणार

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आर्यन-गौरी, अन्यना पांडे परदेशी रवाना

रक्तातील ॲाक्सिजनची पातळी कशी वाढवावी?, ‘या’ सोप्या गोष्टी नक्की करुन पाहा

पहिल्या लसीचा डोस घेतल्यानंतर कोरोना झाल्यास दुसरा डोस कधी घ्यायचा? तज्ज्ञ म्हणतात…

‘घरात रहा म्हणून सांगत होतात मग ते तुम्ही का नाही पाळलं?’; भाजप प्रवक्त्यांचा मोदींना सवाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More