बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“शिवसेना भवनासमोर जो राडा झाला त्याचं उत्तर भाजपला दिलं जाईल”

पुणे | भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून शिवसेना भवनावर मोर्चा काढला होता. यावरून शिवसेनेने अग्रलेखाच्या माध्यमातून भाजपवर कडाडून टीका केली होती. त्यानंतर शिवसेना भवनाजवळ भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी धिंगाणा घातला होता. तर राजकीय पटलावर देखील भाजप आणि सेना नेत्यांच्यात वाकयुद्ध सुरू आहे. यावर शिवसेेनेतील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

शिवसेनेचे प्रवक्ते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांनीही शिवसेना भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या राड्यावर भाष्य केलं आहे. शिवसेना भवनासमोर जो राडा झाला त्याचं उत्तर भाजपला दिलं जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे. अनिल परब आज पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

उद्या शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्याबाबत परब यांना विचारण्यात आलं. त्यावर दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवसेनेचा वर्धापन दिन होईल. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्धापन दिन साधेपणाने करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत ऑनलाईन संवाद साधणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याचबरोबर अनिल परब यांनी पुणे मेट्रोचं काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान, शिवसेना भवनासमोर भाजप कार्यकर्त्यांनी केलेल्या राड्यावर खासदार संजय राऊत यांनीही भाष्य केलं होतं. गुंडगिरी म्हणत असताल तर कुणी शिवसेना भवनावर, मराठी माणसाच्या अस्मितेचं प्रतिक असलेल्या, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या वास्तूमध्ये बसून राज्याचा कारभार हाकला, त्या वास्तूच्या दिशेनं कुणी चाल करत असेल तर होय, आम्ही गुंड आहोत. आम्ही गुंड आहोत हे सांगण्यासाठी आम्हाला कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. महाराष्ट्राच्या, हिंदुत्वाच्या बाबतीत आम्ही सर्टिफाईड गुंड आहोत, असं राऊत म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या-

नरेंद्र मोदींचा जगात गाजावाजा, ट्रम्प यांनाही मागे टाकलं, लोकप्रिय नेत्यांच्या यादीत अव्वलस्थानी!

“माझ्या इतक्या चौकश्या झाल्या, तो राजकीय विषय नव्हता तर हा कसा असेल?”

400 फूट खोल दरीत कोसळली कार, पुढे जे घडलं ते ऐकून तुम्हीही व्हाल चकीत

ओबीसी आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार- विजय वडेट्टीवार

“राम नामाचा वापर फक्त राजकीय फायद्यासाठी; राम यांच्यापासून किती लांब आहे, हे स्पष्ट होतंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More