बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करावा अन्यथा…”

मुंबई | एसटी कर्मचारी आणि राज्य सरकार यांच्यातील संघर्ष अधिकच वाढताना दिसत आहे. एकीकडे मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत संप मागे घेणार नसल्याचं कर्मचारी म्हणत आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकार विलीनीकरणाच्या मागणीसाठी विचार करून निर्णय घेतला जाईल असं सांगत आहे. त्यातच परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना एक इशारा दिला आहे.

परब यांनी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायलयाच्या आदेशाचा सन्मान करावा, असा इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा सन्मान करावा अन्यथा न्यायालयाच्या निर्णयाच्या अवमान केल्याप्रकरणी कारवाई करावी लागेल. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळेल, असा इशारा परब यांनी दिला आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर तोडगा काढण्याचा विचार केला जाईल, असंही ते म्हणाले आहेत.

ते पुढे म्हणाले, विलीनीकरणाच्या मागणी व्यतिरिक्त कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. पण महामंडळाच राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करणं हे एक-दोन दिवसांच काम नाही. त्यासाठी विचार करून निर्णय घेतला जाईल. एसटी कर्मचाऱ्यांच्या आठमुठ्या धोरणामुळे हा निर्णय घेणं होणार नाही, असं म्हणत त्यांनी कर्मचाऱ्यांना न्यायालयाचा निर्णय मान्य करण्याची मागणी केली आहे.

कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा असं सांगत अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांकडे संप मागे घेण्याची विनंती केली आहे.”आम्ही दिलेला शब्द पाळला आहे. इतर सर्व मागण्या मान्य झाल्या असून विलीनीकरणाच्या मागणीवर सारासार विचार करून निर्णय घेतला जाईल” असंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“एसटीला भगवा दिला, पण कर्मचारी नागवा झाला”

“मला संपवण्यासाठी महाविकास आघाडीने षडयंत्र रचून…”

“बिघडलेल्या अभिनेत्यांची बिघडलेली पोरं गांजा ओढतात यावर चर्चा सुरूये पण इकडे शेतकरी…”

“कुत्री जरी मेली तरी दिल्लीतील नेत्यांकडून शोकसंदेश दिला जातो पण…”

नवाब मलिकांचा समीर वानखेडेंच्या मेहुणीवर गंभीर आरोप, म्हणाले…

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More