बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर सरकार हातावर हात धरून बसणार नाही, कारवाई करेल”

मुंबई | मागील काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकराला आहे. एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरन करण्यात यावं या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यावर परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा, अशी विनंती केली आहे.

मागील 11 दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने सामान्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. त्यामुळे खासगी वाहनचालक या संधीचा फायदा घेऊन प्रवासांकडून जास्तीचे पैसे आकारत आहेत. यावर अनिल परब यांनी अशा वाहनचालकांना जास्तीचे पैसे आकारणाऱ्या वाहनांविरोधात कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

याशिवाय त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी देखील आवाहन दिलं आहे. उच्च न्यायलयाने दिलेल्या निर्देशानुसार आम्ही समिती गठीत केली. दुपारी 3 वाजता GR काढला. 4 वाजता बैठक घेतली. न्यायलयाचा अंतिम आदेश आल्यानंतर यावर निर्णय घेतला जाईल, असं सांगत माझी दारं चर्चेसाठी नेहमी खुली असतील, असंही त्यांनी नमूद केलं आहे.

यावेळी परब यांनी भाजपला लक्ष्य करत भाजप एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप  केला आहे. त्यामुळे लोकांना त्रास होत आहे, असंही त्यांनी सुनावलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“वेड्या, भाजप महाराष्ट्राच्या मातीत तयार झालेला पक्ष आहे”

“पोलिसांना कलेक्शनसाठी वापरता मग ड्रग्ज रोखण्यासाठी का वापरत नाहीत?”

“पडळकरांच्या जिवाला काही झाल्यास राष्ट्रवादीचे नेते जबाबदार असतील”

“तेच मी माझ्या बंधूंना गेली कित्येक दिवस सांगतोय की…”

“एसटी कर्मचाऱ्यांनी न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करावा अन्यथा…”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More