बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“परिवहन मंत्री केवळ मुख्यमंत्र्यांचे कलेक्टर आहेत”

सिंधुदुर्ग | केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे. परिवहन मंत्री हे केवळ मुख्यमंत्र्याचे कलेक्टर असल्याचा खोचक टोला त्यांनी लगावला आहे. सावंतवाडीत एसटी आगारात सुरु असलेल्या आंदोलनाला नारायण राणे यांनी  सोमवारी भेट दिली. यावेळी त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच अनिल परब यांच्यावर जोरदार टीका देखील केली आहे.

राणे यावेळी म्हणाले, “परिवहन मंत्री जरी कोकणचे असले तरी त्यांना कोकणी माणसाबद्दल विशेष काही आत्मीयता नाही. ते केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कलेक्टर आहेत,” असा टोला त्यांनी अनिल परब यांना लगावला आहे.शिवाय त्यांनी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. ते म्हणाले, “शरद पवार हे कधीही कोणत्याही बाबतीत तोडगा काढणार नाहीत. खेळवत राहणं हे त्यांचं काम आहे,” अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे.

यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ते म्हणाले, “एसटी महामंडळ हे सरकारच्या नियंत्रणात येते. मात्र गेले 15 दिवस एसटी कर्मचारी संप करत आहेत. तरीही सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. हा एसटी कर्मचाऱ्यांचा जीवाचा प्रश्न आहे. आतापर्यंत जवळपास 40 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करून त्यांना अजूनही त्यांना खेळवतच आहे,” अशी टीका त्यांनी केली आहे.

यावेळी नारायण राणेंनी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्याची भेट घेणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. आता या प्रश्नावर केद्रांच्या माध्यमातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं आहे. एसटी कर्मचाऱ्यांचं मागील 3 आठवड्यांपासून विलिनीकरणाच्या मागणीसाठी संप सुरुच आहे. मात्र अजूनही या संपावर तोडगा निघालेला नाही.

थोडक्यात बातम्या-

काँग्रेसने आपल्या ‘त्या’ विधान परिषद उमेदवारांची नावं केली जाहीर

“गद्दारी केल्यास मी सहन करणार नाही, मी आमदार असताना…”

“आर्यन खानने जे काही भोगलं त्याची भरपाई कोण देणार?”

अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी सुनावलं नवं फर्मान

प्रियांका चोप्रानं नावात केला मोठा बदल, धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More