बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ वर्षीही भेटणार वाहतूक करात सवलत?; ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई |  कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर सर्वच क्षेत्रांना मोठा आर्थिक फटका बसला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मागील वर्षी मोटार वाहन कर 50 टक्के कमी करून वाहतूक संघटनांना दिलासा दिला होता. यावर्षी देखील अशीच सवलत मिळणार का? याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

अशातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची वाहतूक संघटनांसोबत बैठक झाली. ही बैठक सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली. यावेळी महाराष्ट्र राज्य ट्रक, टेम्पो, टँकर्स, बस वाहतूक महासंघाचे अध्यक्ष प्रसन्न पटवर्धन, उपाध्यक्ष महेंद्र लुले, सरचिटणीस दयानंद नाटेकर यांनी आपल्या मागण्या मांडल्या.

राज्यातील वाहतूकदारांच्या बाबतीत योग्य तोडगा लवकरच काढला जाईल. वित्त व परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या जातील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातील शहरांमध्ये ट्रक व बस यांच्यासाठी पुरेसे विमानतळ असणे गरजेचे आहे. यासाठी नगरविकास विभागाला योग्य सूचना देऊन मोकळ्या जागांचे नियोजन करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

चेक पोस्टच्या ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटर उभारण्याचे नियोजन करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले. चेकपोस्टवर वाहनामागे केली जाणारी 195 रुपयांची वसुली त्वरित बंद करण्यात यावी, जड वाहनांच्या पार्कींगसाठी जागा उपलब्ध करून द्याव्यात, मोटार वाहन व व्यवसाय कर एका वर्षासाठी माफ करावा, कामगार वाहतूक करणाऱ्या वातानुकूलीत बसचा कर कमी करावा, जड व अवजड वाहनांना राज्यातील प्रमुख शहरांत 10 ते 16 तास करण्यात आलेली प्रवेशबंदी हटवावी, कालबाह्य प्रलंबित वाहतूक खटले रद्द करावेत, सार्वजनिक वाहनांच्या तपासणीचे पोलिसांचे अधिकार रद्द करावेत, अशा मागण्या पदाधिकाऱ्यांनी केल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे यावेळी उपस्थित होते.

थोडक्यात बातम्या

विमानाचा रंग पांढराच का असतो?, ‘हे’ आहे त्यामागचं विशेष कारण

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! ‘या’ दिवशी राहणार पाणीपुरवठा पुर्णपणे बंद

धावत्या रेल्वेतून गरोदर महिला पडली खाली, देवदूतासारखा धावून आला RPF जवान, पाहा व्हिडीओ

“हा केवळ योगायोग आहे की, मुख्यमंत्र्यांचं इटलीसोबतच लांगुलचालन?”

आर्यन खानच्या सुटकेसाठी ‘या’ शिवसेना नेत्याची थेट सर्वोच्च न्यायालयात धाव

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More