पुणे | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या 3 मे पर्यंत देशभरात लॉकडाउन वाढवण्यात आले आहे. लोकांची जीवानावश्यक वस्तूंसाठी मारमार सुरू आहे. मात्र एकीकडे देशासह राज्यात गंभीर परिस्थिती असताना पुण्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यात चक्क एका दुधाच्या टॅँकरमधून बिअरच्या बाटल्यांची वाहतूक केली जात असताना हा टँकर पोलिसांनी कात्रज भागात पकडला आहे. या धक्कादायक प्रकारामुळे सर्वत्रच खळबळ उडाली आहे.
भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांनी काल रात्री कात्रज परिसरात टेम्पोतील 29 हजार रुपयांचे बिअरचे 12 बॉक्स पकडले आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टेम्पो चालकाला ताब्यात घेत टेम्पो जप्त करून भारती विद्यापीठ पोलिसांकडे देण्यात आला आहे.
काल रात्री भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस कात्रज घाट परीसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार पारखी, तोंडे यांच्यासह पोलीस नाईक भिंगारे यांना एक दुधाचा टेम्पो संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आलं.
दरम्यान, पोलिसांनी चालकाला थांबवून त्यांची चौकशी केली असता तो खोट बोलत असल्याचे निदर्शनास आलं. त्यामुळे पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये दुधाच्या कॅरेटच्या पाठीमागे ठेवलेले 29 हजार रुपयांचे 12 बिअर बॉक्स सापडले.
ट्रेंडिंग बातम्या-
धार्मिक तेढ निर्माण करणारा संदेश टाकणाऱ्यासह दहा ग्रुप अॅडमीनवर गुन्हा दाखल
‘लॉकडाउनचे चटके सोसणाऱ्यांच्या अन्न-सुरक्षेची काळजी घ्या’; सोनियांचं मोदींना पत्र
महत्वाच्या बातम्या-
नरेंद्र मोदींनी सांगितली सप्तपदी… नागरिकांना सूचना पाळत साथ देण्याचं केलं आवाहन
देशभरातला लॉकडाऊन 3 मे पर्यंत वाढवला; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
अन्य देशांच्या तुलनेत भारताने लवकर पावलं उचलली म्हणूनच भारत मोठ्या संकटापासून वाचला- नरेंद्र मोदी
Comments are closed.