महिलांनो बाहेर पडताना बॅगमध्ये ‘या’ 5 गोष्टी ठेवाच; अन्यथा होईल मोठी पंचाईत

Travel Tips | महिला घराबाहेर पडताना नेहमी आपल्या सोबत पर्स ठेवत असतात. या पर्समध्ये गरजेच्या गोष्टी असतात. मात्र, कधी-कधी अशी परिस्थिती निर्माण होते, तेव्हा गरजेची वस्तु आपल्या जवळ राहतच नाही. मग, अशावेळी अडचणीचा सामना करावा लागतो.

विशेषतः जेव्हा तुम्ही एकट्यानेच प्रवास करत असता, तेव्हा अनेक गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. अशावेळी तुम्ही तुमच्या बॅगमध्ये काही गोष्टींचा समावेश आवर्जून करायला हवा.  कुठे बाहेर फिरायला गेल्यावर महिलांच्या बॅगमध्ये 5 गोष्टी असायलाच हव्यात. आता या गोष्टी नेमक्या कोणत्या, याबाबत या लेखात सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

पर्समध्ये ‘या’ 5 गोष्टी ठेवा

मल्टी पाउच मेकअप बॅग : सुंदर दिसणं म्हणजे खूप सारा मेकअप करणं नाही. पण, आपल्या दिसण्यावरून बरंच काही ठरत असतं. आपली केशरचना, चेहरा व्यवस्थित असला तर आपले व्यक्तिमत्व उठून दिसते. बाहेर सहलीला गेल्यावर उन्हामुळे चेहरा खूप खराब होऊन जातो. मग, अशावेळी तुमच्या बॅगमध्ये मल्टी पाउच मेकअप बॅग असायलाच हवी.या मल्टी-पाऊच मेकअप बॅगमध्ये तुम्ही मेकअप, लोशन आणि टॉयलेटरीज एकत्र ठेवू शकता. या बॅगमध्ये सगळ्या गोष्टी कॅरी करता येतात.

टिश्यू पेपर : टिश्यू पेपरचा वापर तुम्ही घाण साफ करणे, हात स्वच्छ करणे, मेकअप पुसून काढणे किंवा घाम पुसणे अशा अनेक गोष्टींसाठी करू शकता. प्रवास करताना याचा खूप (Travel Tips ) उपयोग होतो.

सॅनिटरी पॅड : बऱ्याचदा तुम्ही बाहेर गेल्यावर अचानक पिरीयड येतात.कधी-कधी पिरीयड लवकर येतात किंवा उशिरा येतात.मग, अशावेळी काही अडचण यायला नको म्हणून तुम्ही सोबत कायम सॅनिटरी पॅड ठेवायलाच हवा.

सेफ्टी पिन : सेफ्टी पिन छोटी वस्तु असली तरी त्याचा उपयोग खूप मोठा आहे. प्रवासादरम्यान तुमचे कपडे कधी फाटू शकतात किंवा उसवू शकतात. अशावेळी अनेकदा आपली पंचाईत होते. अशावेळी सेफ्टी पिन खूप उपयोगी ठरते.

बँड-एड : प्रवास करताना खरचटणे, फोड, कीटक चावणे किंवा शू बाईटच्या जखमा अशा अनेक समस्या अचानक येऊ शकतात. अशा परिस्थितीत, बॅगमध्ये बँड-एड ठेवल्यास तुम्हाला (Travel Tips )तुमच्या जखमेवर ताबडतोब उपचार करता येईल.

News Title – Travel Tips for Womens

महत्त्वाच्या बातम्या-

अधिक मीठ खाणं जीवघेणं ठरतंय, जागतिक आरोग्य संघटनेचा गंभीर इशारा

हिरामंडीमधील ओरल सेक्सच्या सीनबाबत शेखर सुमनचा खुलासा!

“…तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार?”; बड्या नेत्याने थेट फार्म्युलाच सांगितला

“राज ठाकरेंचं महाराष्ट्राच्या राजकारणातील स्थान काय?”

बारावीच्या निकालाबाबत अत्यंत महत्वाची अपडेट समोर!