सूड, हल्लाबोल, गौप्यस्फोट; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा पहिला टीझर प्रदर्शित
मुंबई | महाराष्ट्रातील प्रादेशिक पक्ष शिवसेना (Shivsena) या पक्षात अभूतपूर्व बंड झाले. शिवसेनेच्या तब्बल दोन तृतीयांश आमदार आणि 18 पैकी 12 खासदारांनी बंड करत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात प्रवेश केला. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत सरकार स्थापन केले आणि ते राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.
त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. त्यांची ही मुलाखत (Special Interview) राज्यातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्वाची ठरणार आहे. त्यांची ही मुलाखत सामना या शिवसेनेच्या मुखपत्र असलेल्या दैनिकात दि. 26 आणि 27 जुलै रोजी दोन दिवसांत छापून येणार आहे.
सदर मुलाखतीचा पहिला टीझर (Teaser) प्रदर्शित झाला आहे. संजय राऊत यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन याचा टीझर शेअर केला. राऊतांनी टाकलेल्या या 45 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये सूड, हल्लाबोल आणि गौप्यस्फोट असे शब्द ऐकायला मिळतात तसेच या टीझर मध्ये शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचे? असे प्रश्न विचारले गेले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींची ही पहिली मुलाखत आहे.
संजय राऊत सदर मुलाखतीत उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) शिवसेना पक्षातील बंड आणि शिवसेनेचे आगामी वाटचाल याविषयी प्रश्न विचारत आहेत. एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांच्या गटाने शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक आरोप केले होते. त्यावेळी शिवसेनाप्रमुखांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण ह्या मुलाखतीत राऊतांनी त्यांना बोलते केले आहे. त्यामुळे सर्वच अंगानी ही मुलाखत महत्वाची ठरणार आहे.
सामना
26 आणि 27 जुलै
उद्धव ठाकरे यांची जोरदार मुलाखत pic.twitter.com/UrzhfDvdx7— Sanjay Raut (@rautsanjay61) July 24, 2022
थोडक्यात बातम्या –
तिच टीका करत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं, म्हणाले…
पावसाचा जोर पुन्हा वाढणार, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
असदुद्दीन ओवैसींचे पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप, म्हणाले…
मंकीपाॅक्सच्या ‘या’ गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका, वाचा सविस्तर
‘यापूर्वी आला नव्हतात पण आता याच’, बंडखोर आमदाराचं आदित्य ठाकरेंना आव्हान
Comments are closed.