बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कच्चा बादाम’ गाण्यावर चिमुकलीचा क्यूट डान्स व्हायरल; तुम्ही पाहिला का व्हिडीओ?

नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर कच्चा बादाम हे गाणं जोरदार व्हायरल होतं आहे. अनेक तरूण-तरूणी सोशल मीडियावर रिल्स बनवत आहेत. लहान मुलामुलींचे कच्चा बादाम गाण्यावरील व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यातच आता क्युट मुलीचा कच्चा बादाम गाण्यावरील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका आयएएस अधिकाऱ्याने हा व्हिडीओ ट्विट केला आहे. (cute dance viral on the song kachcha badam)

कच्चा बादाम या गाण्याने प्रकाश झोतात आलेला गायक भुबन बादायकर यांच्यासह अनेक लोक रिल्स बनवून फेमस झाले आहेत. एका निरागस मुलीने कच्चा बादाम या गाण्यावर केलेला डान्स तुम्ही पाहतचं राहाल. या मुलीने इतका सुंदर डान्स सोशल मीडियावर लोकांना भूरळ घालत आहे. अनेक नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

कच्चा बादाम गाण्यावर डान्स करणारी मुलगी शाळेत जाण्यासाठी तयार आहे. या मुलीच्या आसपास कुटूंबातील काही महिला सदस्य बसलेल्या आहेत. लहानग्या मुलीने कुठलीही चूक न करता डान्स केला आहे. अगदी हुबेहुब स्टाईल केली आहे. मुलीच्या या एक्सप्रेशनने लोकांनाही आश्चर्यचकित केलं आहे. या मुलीचा डान्स ज्या कोणी पाहिलं तो तिचं कौतूक केल्याशिवाय राहणार नाही.

दरम्यान, लहानग्या मुलीचा हा 15 सेकंदाचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओला एक लाखापेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे आणि 13 हजार लोकांनी लाईक केलं आहे. अनेक नेटकऱ्यांनी व्हिडीओ रिट्विट केला आहे. आयएएस अधिकारी अश्विन शरण यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे. मुलीची प्रशंसा करताना क्युट कच्चा बादाम ,असं अश्विन शरण यांनी लिहिलंं आहे.

पाहा व्हिडिओ-

थोडक्यात बातम्या- 

काँग्रेसमध्ये दुफळी! कपिल सिब्बल यांचा काँग्रेसला घरचा आहेर, म्हणाले…

“दरेकरांनी आडनाव बदलून दरोडेखोर करावं”

Russia Ukraine War: एलोन मस्कचं पुतीन यांना खुलं आव्हान, म्हणाले…

‘शैक्षणिक संस्थामध्ये हिजाब बंदी योग्य’; उच्च न्यायालयचा मोठा निर्णय

मुळशी पॅटर्नमधील ‘ती’ चहावाली अभिनेत्री आज कोट्यावधींची मालकीण, वाचा काय करतेय काम

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More