बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

संधी सोडू नका! iPhone 12 Mini वर मिळतोय आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट

नवी दिल्ली | फ्लिपकार्ट (Flipcart) वर नुकतीचं बिगबचत सेलला सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्टने त्यांच्या अनेक प्रॉडक्टवर आकर्षक ऑफर दिल्या आहेत. हा सेल 7 जानेवारीला सुरु झाला असून 9 जानेवारीपर्यंत राहणार आहे. या सेलमध्ये आयफोन विकत घेण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी बम्पर ऑफर देण्यात आली आहे.

फ्लिपकार्टवरील सेलमध्ये iPhone mini 12 या फोनवर मोठी ऑफर दिली आहे. iPhone mini 12 ची लाँच प्राईज 59,900 रुपये आहे. परंतु फ्लिपकार्टवरील महाबचत सेलमध्ये या फोनवर 31 टक्क्यांचा डिस्काऊंट दिला आहे. हा फोन आता या ऑफरमुळे 40,999 रुपयांना मिळतो आहे. याशिवाय फ्लिपकार्टवर इतरही ऑफर दिल्या आहेत.

अनेक बँकेच्या कार्डवर डिस्काऊंट आणि एक्सेंज ऑफरही फ्लिपकार्टने दिली आहे. या फोनवर ॲक्सिस बँक 5 टक्के डिस्काऊंट देत आहे. ॲक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास तुम्हाला 2050 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. या डिस्काउंटनंतर फोनची किंमत 38, 949 रुपये होईल. त्यामुळे ग्राहकांची  बरीचशी बचत होणार आहे.

दरम्यान, फ्लिपकार्टने या फोनवर एक्सेंज ऑफरही दिली आहे. जर तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सेजं केला तर तुम्हाला 15,450 रुपयांचा डिस्काऊंट मिळेल. पण त्यासाठी तुम्ही एक्सेंज करणारा फोन चांगल्या स्थितीत असायला हवा. तरचं तुम्हाला हा डिस्काउंट मिळू शकणार आहे. या ऑफरसहीत फोनची किमंत 23,499 रुपये होणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“धनंजय मुंडे यांचाही आमच्या पक्षाला पाठिंबा”, करूणा मुंडेंचा दावा

प्रतिक्षा संपली! सुपरडुपर हिट पुष्पा सिनेमा आजपासून टीव्हीवर पाहता येणार!

मोठी बातमी! ओबीसी आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

महिलेच्या केसात थुंकल्याच्या प्रकरणावरून जावेद हबीब यांनी मागितली माफी, म्हणाले…

‘या’ तारखेपासून राज्यात मुसळधार पावसाचा तडाखा, हवामान विभागाचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More