मुंबई | राज्यातील मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाला आश्वासित केलं. या प्रकरणावर मी सरकारशी बोलेन, असंही राज ठाकरे यांनी शिष्टमंडळाला सांगितलं. (Tribakeshwar Priests Meet MNS Raj Thackeray)
राज्यातील मंदिरं खुली करण्यात यावी यासाठी त्र्यंबकेश्वर येथील पुजाऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्र्यंबक पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, संतोष धुरी उपस्थित होते. (Tribakeshwar Priests Meet MNS Raj Thackeray)
“धार्मिक स्थळं उघडायला हवीत परंतु धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? त्याची एक नियमावली ठरवावी लागेल, मी सरकारशी बोलतो. कारण मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?”, असा सवाल राज ठाकरे यांनी यावेळी उपस्थित केला. (Tribakeshwar Priests Meet MNS Raj Thackeray)
“धार्मिक स्थळं उघडायला हवीत परंतु धार्मिक स्थळं उघडल्यानंतर झुंबड उडाली तर काय? त्याची एक नियमावली ठरवावी लागेल, मी सरकारशी बोलतो. कारण मॉल उघडले तर मंदिरं का नाहीत?” – मनसे अध्यक्ष @RajThackeray #महाराष्ट्रधर्म pic.twitter.com/kKekFU6mrx
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 17, 2020
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंदिरे फेब्रुवारीपासून बंद ठेवण्यात आली आहे. राज्यात सध्या टाळेबंदीमध्ये शिथीलता आणण्यात येत आहे. याच शिथीलतेमध्ये मंदिरांना देखील सूट देण्यात यावी, अशी मागणी आता होताना दिसून येत आहे, गेले अनेक भाजपचे नेते आमदार तसंच शनिवारी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील मंदिरं खुली करण्याची मागणी ट्विट करून केली होती. (Tribakeshwar Priests Meet MNS Raj Thackeray)
महत्त्वाच्या बातम्या-
डाॅ. राजेश देशमुख पुण्याचे नवे जिल्हाधिकारी
“आदित्य ठाकरे सक्षम नेता, त्यांच्यात काम करण्याची जिद्द आहे”