बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रपती झाल्यानंतर दौपदी मुर्मूंना मिळणार ‘इतका’ पगार; बंगला आणि गाड्यांसह सुरक्षाही सर्वोच्च

नवी दिल्ली | राष्ट्रपतींच्या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (NDA) उमेदवार दौपदी मुर्मू (Draupadi Murmu) विजयी झाल्या. त्या देशाच्या नव्या आणि 15 व्या राष्ट्रपती झाल्या आहेत. त्या 6,76,803 एवढ्या मताधिक्यांनी विजयी झाल्या. तर त्यांच्या विरोधात उभे असलेले विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना 3,80,177 मते पडली. आता सर्व सामान्य जनतेला राष्ट्रपतींच्या आयुष्याची, त्यांच्या कामकाजाची, निवासस्थानाची आणि पगाराबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

दौपदी मुर्मू यांना प्रतिमहा 5 लाख रुपये पगार मिळणार आहे. भारताचे राष्ट्रपती (President of India) हे देशातील सर्वाधिक पगार घेणारे शासकीय आणि राजकीय व्यक्ती असतात. पगाराव्यतिरिक्त राष्ट्रपतींना इतर भत्ते (Allowances) देखील मिळतात. राष्ट्रपतींना मिळणाऱ्या पगारावर त्यांना आयकर (Income Tax) भरावा लागतो. राष्ट्रपतींचे अधिकृत निवासस्थान हे राष्ट्रपती भवन (Official Residence of President of India) असते. त्यात ते सर्व बैठका आणि भेटी घेतात. तसेच राष्ट्रपती भवनातच देशातील नागरी सन्मान पुरस्कारांचे वितरण केले जाते.

यापुढे मुर्मू यांच्या अधिकृत निवासस्थानाचा पत्ता, राष्ट्रपती भवन, प्रेसिडेंट ईस्टेट, नवी दिल्ली, 110004 असेल. राष्ट्रपती भवनाव्यतिरिक्त राष्ट्रपतींच्या निवासासाठी शिमल्याला मशोब्रामध्ये द रिट्रीट बिल्डींग आणि हैद्राबादमध्ये राष्ट्रपती निलायम आहे. राष्ट्रपतींना प्रवासासाठी वापरण्यात येणाऱ्या गाड्या या बुलेटप्रुफ (Bulletproof) आणि शॉकप्रुफ असतात. या गाड्यांवर बुलेट, बॉम्ब, गॅस अटॅक आणि इतर स्फोटकांचा कोणताही परिणाम होत नाही.

राष्ट्रपतींची सुरक्षा (Security of President) ही देशातील इतर कोणत्याही नेत्या किंवा राजकारण्यापेक्षा जास्त असते. राष्ट्रपती हे देशाचे पहिले नागरिक असतात आणि त्यामुळे त्यांच्या सुरक्षेसाठी तीनही लष्कराच्या तुकड्यांमधील सर्वोत्तम सैनिकांना राष्ट्रपतींच्या सुरक्षेसाठी नेमले जाते.

थोडक्यात बातम्या – 

ओबीसी आरक्षणाचे आम्हीच जनक! भाजप-शिवसेनेत श्रेय घेण्यासाठी चढाओढ

नरेंद्र मोदींनी द्रौपदी मुर्मू यांची निवासस्थानी भेट घेत दिल्या शुभेच्छा!

“चित्राताई, उद्या तुम्ही ब्ल्यू फिल्म टाकून, त्यावरही उत्तर मागाल”

“धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आलीये” 

राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याला ईडीचा झटका!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More