बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तात्काळ निलंबन करा, संविधान दिनी तरी…”, चित्रा वाघ कडाडल्या

मुंबई | वसई ग्रामीण भागातील ( Vasai Rural Area ) आदिवासी महिलांना (Tribal Womens ) पोलिसांनी चोर समजून मारहाण केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. या पोलिसांवर अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही. तर महिलांना कोणतीही मारहाण केली नसून केवळ समज देण्यासाठी आम्ही त्यांना ताब्यात घेतलं होतं. असं पोलिसांनी सांगितल होत. आता या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ ( BJP Leader Chitra Wagh) यांनी संताप व्यक्त केला आहे.

चित्रा वाघ यांनी ट्विट करून या प्रकरणावरून महाविकास आघाडीवर टीका केली आहे. त्यांनी ट्विट मध्ये म्हटले आहे, वसईत पोलिसांनी चोर समजून 6 आदिवासी महिलांना बेदम मारहाण केलीय, असं म्हणून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय, पोलिस यंत्रणाची, महाविकास आघाडी सरकारची हीच खरी वृत्ती आहे. इंग्रजांच्या जुल्मी राजवटी सारखी,’ अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

पुढे त्यांनी ट्विटमधून महाविकास आघाडी सरकारला सुनावलं आहे, ‘पोलिसाचं तात्काळ निलंबन करावं आणि संविधान दिनी तरी राज्य भीमाच्या कायद्यान चालतंय हे दाखवून द्यावं,’ असा घणाघात त्यांनी ट्विटमधून केला आहे. वसई येथे विनाकारण महिलांना मारणाऱ्या पोलिसांवर आदिवासी लोकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.

दरम्यान, मारहाण करण्यात आलेल्या आदिवासी महिला या मुळच्या पालघर जिल्ह्यातील कासा येथील आहेत. घटनेला 2 दिवस उलटून गेले असून या  प्रकरणी अजूनही पोलिसांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. तर, मारहाण झालेल्या महिलांना अजूनही न्याय मिळाला नसल्याने या महिलांनी आदिवासी संघटनांना मदत मागितली आहे.

 

थो़डक्यात बातम्या-

सलाम त्यांच्या कार्याला! जीव धोक्यात घालत केलं लसीकरण पूर्ण

“बहोत हो गई महंगाई की मार, अब की बार…”, भाजपला खडे बोल

आधी धक्का, मग खळबळ अन् एकनाथ शिंदेंना हसू आवरेना – पाहा व्हिडीओ

“मी आता आई होण्यासाठी जास्त वाट पाहू शकत नाही”

“तुला मराठी ठाऊक नाही का? हा महाराष्ट्र आहे…”, राज्यपाल कोश्यारी संतापले

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More