बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवर पण ममता बॅनर्जींचा पराभव?

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला आज सकाळपासून सुरुवात झाली आहे. भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस असा चुरशीचा सामना पश्चिम बंगालमध्ये पाहायला मिळत आहे. दोन्ही पक्षांनी कंबर कसून या निवडणुकीत प्रचारसभा घेत मोठ्या प्रमाणात दावे-प्रतिदावे केले.

निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून तृणमूल काँग्रेस सकाळी 11 वाजेपर्यंत जवळपास 191 जागांवर आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर भाजप 96 जागांवर आघाडीवर आहे. पश्चिम बंगालमध्ये एकूणच तृणमूल काँग्रेस आघाडीवर असलं तरी ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ असलेल्या नंदिग्राममध्ये मात्र वेगळं चित्र पाहायला मिळत आहे.

ममता बॅनर्जी यांच्या विरोधात भाजपचे शुभेंदू अधिकारी हे मैदानात उतरले आहेत. मतमोजणी दरम्यान चौथ्या फेरी अखेर ममता बॅनर्जी 7 हजार मतांनी पिछाडीवर असल्याचं दिसून आलं. शुभेंदूू अधिकारी हे नंदिग्राममध्ये सध्या आघाडीवर असून ममता बॅनर्जी या पिछाडीवर आहेत.

नंदिग्राममध्ये 88 टक्के मतदान झालं असून या मतदारसंघातील मुस्लीम मतं निर्णयाक स्वरूपाची ठरणार आहेत. पूर्वी तृणमूल काँग्रेसमध्ये असणारे शुभेंदू अधिकारी हे आता तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांच्या विरोधात ‘काँटे की टक्कर’ देत असताना पाहायला मिळत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

“अंगावरचे सगळे कपडे काढ” दिग्दर्शकाने केलेल्या विचित्र मागणीचा ‘या’ अभिनेत्रीने केला खुलासा

चिंताजनक! गेल्या 24 तासात देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय वाढ

दिलासादायक! नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण वाढलं

राज्यातील ‘ही’ दुकानं आता आठवड्यातील 7 दिवस सुरू राहणार; राज्य सरकारची मोठी घोषणा

पंढरपुर विधानसभा मतदारसंघाचं भवितव्य आज ठरणार; चुरशीच्या लढतीत कोण होणार विजयी?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More