देश

तृणमूल काँग्रेसच्या आमदाराची गोळ्या झाडून हत्या

कोलकाता | पश्चिम बंगालध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार सत्यजीत बिश्वास यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. शनिवारी रात्री त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बिश्वास यांच्या हत्येमुळे पश्चिम बंगालमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सत्यजीत यांची हत्या भाजपच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यात ही घटना घडली आहे.

सत्यजीत बिश्वास हे कृशनगर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. बिश्वास हे फुलबाडी परिसरात आयोजित सरस्वती पुजेच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. 

दरम्यान, सत्यजीत यांच्या हत्येमागे भाजपचे मुकूल राॅय यांचा हात असल्याचा आरोप तृणमूलचे जिल्हाध्यक्ष गिरीशंकर दत्त यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-राजकारणात खुनशी वृत्ती वाढीस लागलीय- एकनाथ खडसे

‘बाद’ फलंदाज पुन्हा मैदानात, क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं!

-प्रकाश आंबेडकरांनी सत्तेचे स्वप्न पाहू नये- रामदास आठवले

राहुल गांधीच्या जीवनावर आधारित ‘माय नेम इज रागा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

हजारो प्रेक्षकांसमोर तिनं असं काही विचारलं की पांड्या लाजला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या