Top News

अखेर लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर; काँग्रेससह प्रमुख पक्षांचा सभात्याग

नवी दिल्ली | तिहेरी तलाक विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आलं. यावेळी पार पडलेल्या मतदानात 303 मतं ही या विधेयकाच्या बाजूने तर 82 मतं विरोधात पडली.

काँग्रेस, जेडीयू, तृणमुल काँग्रेस, टीएसआर, वायएसआर काँग्रेसने याला विरोध दर्शवत सभात्याग केला. आता हे विधेयक मंजुरीसाठी राज्यसभेत पाठण्यात येईल, मात्र तिथं भाजपला बहुमत नसल्यानं या विधेयकाचा निभाव लागणं कठीण आहे.

एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी हे विधेयक मुस्लीम महिलांवर अन्याय करणारं असल्याचा आरोप केला आहे. याला भाजपच्या खासदार पूनम महाजन यांनी महिला सशक्तीकरणाचा मुद्दा मांडत ओवैसींना प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, विधेयकात करण्यात आलेल्या तरतुदीनुसार तलाक देणाऱ्या पतीला 3 वर्ष शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-बरं झालं गेले… आम्हाला युवकांना संधी देता येईल- मेहबूब शेख

-भाकड म्हशींच्या गोठ्याचे मालक होत असल्याबद्दल उद्धव ठाकरेंचं अभिनंदन!

-पवार साहेब एवढे ह्रदयात होते तर मग प्रेमभंग का केला??- सक्षणा सलगर

-मी शेतकऱ्यांचे मोबाईल मोफत रिचार्ज करणार ही एक अफवा!

-आझम खान लोकसभा उपाध्यक्षांना म्हणाले; “तुमच्या डोळ्यात डोळे घालून बघत राहावेसे वाटते!”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या