तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला लोकसभेत मंजुरी

नवी दिल्ली | बहुचर्चित आणि देशाचं लक्ष लागलेलं तिहेरी तलाकविरोधी विधेयक अखेर लोकसभेत मंजूर करण्यात आलंय. मुस्लीम महिलांसाठीच्या लढ्याचं हे एक ऐतिहासिक पाऊल मानलं जातंय. 

खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या ‘एमआयएम’ने या विधेयकात काही दुरुस्त्या सुचवल्या होत्या. मात्र या सर्व दुरुस्त्या फेटाळण्यात आल्या.

दरम्यान, या विधेयकाला काँग्रेसने पाठिंबा दिला होता. त्यामुळे विधेयक मंजूर करणं भाजपला सोपं गेलं. तर दुसरीकडे एमआयएमने मात्र या विधेयकाला जोरदार विरोध केला.